मेक्सिको, 13 फेब्रुवारी: कोरोना व्हायरसची (Corona Virus) विविध लक्षणं समोर येत आहेत. ताप, सर्दी खो कल्याबरोबरच अनेक लक्षणं समोर येत आहेत. मेक्सिकोमधील एका 23 वर्षीय महिलेबरोबर देखील कोरोना संक्रमित झाल्यानंतर विचित्र घटना घडली आहे. मेक्सिकोमधील मॉन्टेरे येथील अॅना कॉर्टेझ ही जानेवारीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यावेळी तिला सर्दी तापाबरोबरच वास घेण्याची क्षमता देखील हरवली होती. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या दुधाचा रंग (Breast Milk) हा निऑन ग्रीन (Neon Green) आढळून आला. त्यामुळं तिच्या बाळाला देखील कोरोना संक्रमण झालं. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिच्या दुधाचा रंग पुन्हा नैसर्गिक झाल्याचा दावा देखील तिनं केला आहे. यामध्ये स्थानिक बालरोगतज्ज्ञ आणि स्तनपान विशेषज्ञ (lactation consultant) यांचा देखील सल्ला घेतल्याचं तिनं सांगितलं. यामध्ये हे दूध बाळाच्या आरोग्यासाठी चांगला असल्याचं सिद्ध झाल्यानंतरच पाजण्यात आलं. कोरोना विरुद्ध लढत असताना शरीरातील अँटीबॉडीमुळं दुधाचा रंग बदलला असल्याची शक्यता स्तनपान विशेषज्ञ यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर पालेभाज्या किंवा औषधीयुक्त आहार घेतल्यानं देखील दुधाचा रंग निऑन ग्रीन झाला असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. याविषयी मिररशी बोलताना ऍना हिनं स्थ्यनिक डॉक्टरांनी हे साधारण असल्याचं म्हटलं आहे. बाळ किंवा आई सर्दी आणि पोटाच्या विकाराने त्रस्त असल्यास अशा पद्धतीने दुधाचा रंग बदलत असल्याचं म्हटलं आहे.
हे देखील वाचा - Covid-19 चं नवं लक्षण; कोरोना रुग्णाची बोटं काळी पडल्यानं कापावी लागली
कोरोना (Covid19) हा घातक विषाणू असल्यानं याकडं जास्त लक्ष दिल्याचं देखील अॅना हिनं बोलताना सांगितलं. परंतु बाळाच्या प्रकृतीसाठी आईचं दूध आवश्यक असल्यानं ते बंद न करण्याचं मला डॉक्टरांनी सुचवल्याचं देखील तिनं म्हटलं. कोणताही मोठा आजार होत नाही तोपर्यंत आईने बाळाला दूध देणं थांबवण्याची गरज नसल्याचं अनेक एक्स्पर्टनी म्हटलं आहे. ऍना ही इंग्लिशमधून सायकोलॉजी हा विषय शिकवते. आपल्याबरोबर ही घटना घडल्यानंतर मी इतर अनेक महिलांशी यावर चर्चा केल्याचं देखील तिनं म्हटलं. इतर महिलांना देखील अससिक्सग अनुभव आल्याचं आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे बाळाला दूध देणं थांबवलं नसल्याचं देखील तिनं म्हटलं. दरम्यान, डेली मेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार अॅनाने आपला हा अनुभव आणि त्याचे फोटो फेसबुकवर शेअर केल्यानंतर अनेक महिलांनी देखील त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी तिच्याशी संपर्क केल्याचं म्हटलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर दोन दिवसांनी ती पुन्हा रिकव्हर झाल्यानंतर तिचं दूध सामान्य झाल्याचं देखील यामध्ये म्हटलं आहे. इम्पीरियल कॉलेज लंडन येथील स्तनपानाच्या संशोधक आणि ह्यूमन मिल्क फाऊंडेशनच्या सह-संस्थापक डॉ. नताली शेनकर यांनी याविषयी बोलताना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी महिलांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होत असल्याचं म्हटलं आहे. परंतु या अँटीबॉडी दुधात जात असल्याचं जवळपास 90 टक्के प्रकरणांमध्ये समोर आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.