मुंबई, 12 एप्रिल : कोरोना चा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. एकाच दिवसात राज्यातील नव्या कोरोना रुग्णांनी हजारचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत 1 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार आज राज्यात 1115 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अॅक्टिव रुग्णांची संख्या आता 5421 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 9 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार कोरोनाचे रुग्ण 79 टक्क्यांनी वाढले आहेत. ही वाढ मागच्या 7 महिन्यांपेक्षा जास्त असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ज्या राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी केसेस होत्या त्या राज्यांमध्येही आता व्हायरस वेगानं पसरत आहे. चिंतेची बाब म्हणजे केंद्र शासित प्रदेश आणि ज्या राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होते तिथेच वेगानं वाढताना दिसत आहेत. Shocking! आईच्या गर्भातही घुसला कोरोना; 2 बाळांच्या मेंदूची भयानक अवस्था, एकाचा मृत्यू त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सॅनिटायझरचा वापर करण्याचं आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ताप, सर्दी खोकला असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. देशात कोरोना प्रकरणांमधील वाढ ही XBB.1.16 या ओमिक्रॉनच्या नव्या सबव्हेरिएंटमुळे आहे. अशी माहिती आधिकारिक सूत्रांनी दिली आहे. XBB.1.16 ची प्रकरणं फेब्रुवारी 21.6 टक्के होती, जी मार्चमध्ये 35.8 टक्क्यांपर्यंत वाढली. कोरोनाच्या या व्हेरिएंटला आयसोलेट करून त्यावर लशीचा प्रभाव किती आहे, याचा अभ्यासही करण्यात आला. कोरोनाची लस या व्हेरिएंटविरोधात प्रभावी असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे. कोरोनानं वाढवलं टेन्शन! मुलांना सर्वात जास्त धोका, धक्कादायक माहिती समोर कोरोनाची प्रकरणं वाढत असली तरी रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे, मृत्यूचं प्रमाणही वाढल्याचे पुरावे नाहीत. शिवाय पुढील 10-12 दिवस आणखी वाढतील. त्यानंतर ती कमी होतील, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.