जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Shocking! आईच्या गर्भातही घुसला कोरोना; 2 बाळांच्या मेंदूची भयानक अवस्था, एकाचा मृत्यू

Shocking! आईच्या गर्भातही घुसला कोरोना; 2 बाळांच्या मेंदूची भयानक अवस्था, एकाचा मृत्यू

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

कोरोनाग्रस्त प्रेग्नंट महिलेच्या पोटातील बाळावर कोरोनाचा परिणाम होतो, याचा ठोस पुरावा अद्याप सापडला नव्हता.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 09 एप्रिल : आतापर्यंत प्रेग्नंट महिलांच्या गर्भातील बाळाला कोरोना ची लागण होऊ शकते की नाही याबाबत शंकाच होती. पण अखेर आता तसा पुरावा सापडला आहे. आईच्या गर्भातही कोरोना घुसला आहे. महिलांच्या प्रेग्नन्सी च्या कालावधीत कोरोनाने गर्भातील बाळावर हल्ला केला आहे. पोटातील बाळांच्या मेंदूची कोरोनाने भयानक अवस्था केली आहे. यापैकी एका बाळाचा जन्मानंतर काही महिन्यांनी मृत्यू झाला आहे. कोविड-19 हा विषाणू प्रौढांच्या मेंदूच्या ऊतींमध्येही आढळून आला आहे. त्यामुळे गर्भातील बाळांच्या मेंदूच्या ऊतींनाही तो नुकसान पोहोचवू शकतो, अशी शक्यता काही तज्ज्ञांना वाटत होती. पण आतापर्यंत आईच्या नाळेत किंवा बाळाच्या मेंदूमध्ये कोविड-19 आढळल्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता.  आता मियामी विद्यापीठातील संशोधकांचा हा पुरावा सापडला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कोविड विषाणूने प्रेग्नंट महिलेच्या प्लेसेंटामधून गर्भापर्यंत पोहोचून बाळांच्या मेंदूचं नुकसान केल्याचं दिसून आलं आहे. अशी दोन प्रकरणं समोर आली आहेत. कोरोनाची लागण झालेल्या दोन प्रेग्नंट महिलांच्या गर्भात घुसून कोरोनाने त्यांच्या पोटातील बाळांवर परिणाम केला आहे. त्यांच्या मेंदूला हानी पोहोचवली आहे. पेडियाट्रिक्स जर्नलमध्ये या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कॅन्सर, हृदयविकारांनाही रोखता येणार, मिळणार लस; कधीपासून उपलब्ध होणार पाहा या दोन्ही बाळांच्या मातांना कोरोना लस येण्याआधी  2020 साली कोरोनाची लागण झाली होती. यातील एका मुलाच्या आईमध्ये सौम्य लक्षणं होती आणि मुलाचा जन्म पूर्ण कालावधीत झाला होता. तर दुसरी आई इतकी आजारी होती की डॉक्टरांना गर्भधारणेच्या 32 आठवड्यांत मुलाला जन्म द्यावा लागला. मियामी विद्यापीठातील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ. मायकेल पेडास म्हणाले की, कोविड विषाणू ट्रान्सप्लासेंटल मार्गाने गर्भाच्या अवयवापर्यंत पोहोचल्याचा पुरावा आम्ही पहिल्यांदाच उघड करू शकलो आहोत. म्हणूनच ते खूप महत्त्वाचे आहे. सायटोमेगॅलॉइरस, रुबेला, एचआयव्ही आणि झिकायासह अनेक विषाणू प्लेसेंटा ओलांडून गर्भाच्या मेंदूचं नुकसान करण्यास सक्षम आहेत. पण झिका विषाणूच्या प्रभावाप्रमाणे, ही मुले मायक्रोसेफलीसह जन्माला आली नाहीत. मायक्रोसेफली ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मुलांचं डोकं लहान असतं. पण काही कालावधीने या बाळांमध्ये मायक्रोसेफली दिसून आला. कारण त्यांच्या मेंदूची सामान्य गतीने वाढ होणं थांबलं. दोन्ही मुलांचा विकासही उशिरा होताना दिसला. शिवाय त्यांना जन्मापासूनच झटके येत होते. Eggs In Summer : उन्हाळ्यात अंडी खा पण जरा जपून! नाहीतर पडू शकता गंभीरपणे आजारी माहितीनुसार दोनपैकी एक मूल 13 महिन्यांचं होताच, त्याचा मृत्यू झाला आणि दुसरं मूल रुग्णालयात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात