• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Coronavirus : पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्र्यांची आज बैठक, नव्या निर्बंधासह होणार मोठे निर्णय!

Coronavirus : पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्र्यांची आज बैठक, नव्या निर्बंधासह होणार मोठे निर्णय!

महाराष्ट्रानंतर (Maharashtra) देशातील अन्य राज्यांमध्येही कोरोना व्हायरसची परिस्थिती (Coronavirus in India) गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सोबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 मार्च: महाराष्ट्रानंतर (Maharashtra) देशातील अन्य राज्यांमध्येही कोरोना व्हायरसची परिस्थिती (Coronavirus in India) गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सोबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नव्या  निर्बंधासह मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी या बैठकीत कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपयांची समीक्षा करण्याची केली जाईल. त्याचबरोबर लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थींना लस देण्याबाबत निर्णय होऊ शकतो. महाराष्ट्रावर चर्चा देशात सध्या कोरोनामुळे प्रभावित असलेले सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सध्या महाराष्ट्र सामना करत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहले होते. मागच्या आठवड्यात कोव्हिड परिस्थितीचं आकलन करण्यासाठी केंद्रीय टीम महाराष्ट्रात आली होती. त्या टीमने दिलेल्या रिपोर्टनुसार आरोग्य सचिवांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात केंद्राने राज्यात खबरदारीचे उपाय घेण्याबद्दलचा निष्काळजीपणा आणि कमकुवत व्यवस्था या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 17 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरालिकेनं पालिका शाळेतील शिक्षक आणि स्टाफला घरातून काम करण्याची सूचना दिली आहे. आजपासून रोटेशन पद्धतीने 50 टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्याचा निर्णय देखील पालिकेनं घेतला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 23 लाखांच्या पुढे गेली आहे. यामधील जवळपास 53 हजार जणांचा या महामारीत मृत्यू झाला आहे. (हे वाचा : राज्यात कोरोनाची दुसरी लाट; समोर आली धक्कादायक आकडेवारी ) अन्य राज्यांमध्येही कडक नियम महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्येही कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, बडोदा आणि राजकोट या चार प्रमुख महानगरामध्ये रात्रीची संचारबंदी 2 तासांनी वाढवण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील 10 शहरांमध्ये रात्री दहा नंतर दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शहरांमध्ये जबलपूर, ग्वाहलेर, उज्जैन, रतलाम, छिंदवाडा. बुऱ्हानपूर, बैतूल आणि खरगौन या शहरांचा समावेश आहे. त्याशिवाय राज्याची राजधानी असलेल्या भोपाळ आणि इंदूरमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: