पोर्तुगीज, 13 ऑक्टोबर : जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने या गोष्टीची पुष्टी केली आहे. फेडरेशनने मंगळवारी सांगितले की, रोनाल्डोची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. रोनाल्डाचे प्रकृती स्थिर असून त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत
Cristiano Ronaldo (in file photo) tests positive for #COVID19, Portuguese Football Federation releases a statement. pic.twitter.com/caimCec3og
रोनाल्डोचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या अनेक खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्याने साधारण 17 तासांपूर्वी टीममधील साथीदारांसोबत एक फोटो शेअर केला होता. अद्याप फेडरेशनने टीममधील इतर खेळाडूंबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. टीमच्या दुसऱ्या सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे की नाही याची माहिती अद्याप समोर आली नाबी. रोनाल्डोला बुधवारी स्वीडनविरोधात पोर्तुगाल नेशन्स लीग मॅचमधून बाहेर गेले होते. सध्या रोनोल्डोला क्वारंटाईन करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. लक्षणं दिसत नसल्यामुळे भीती नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही माहिती समोर आल्यानंतर रोनाल्डोच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.