बुस्टर डोस घेण्यासाठी काय आहेत अटी? (Condition for Booster Dose) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि ज्यांना कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झाले आहेत, ते खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये या खबरदारीच्या डोससाठी पात्र असतील. हे वाचा-ओमिक्रॉनमुळं चीनचे शांघाय बेजार; लाखो लोकांच्या खाण्या-पिण्याचे होत आहेत हाल आरोग्य मंत्रालयाकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, पात्र लोकसंख्येला दिला जाणारा पहिला आणि दुसरा कोरोना डोस त्याचप्रमाणे आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइनवर काम करणारे कर्मचारी आणि 60+ नागरिकांना देण्यात येणारा बुस्टर डोस पूर्वीप्रमाणेच दिला जाईल. अर्थात या प्रक्रियेसाठी सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे सुरू असलेला मोफत लसीकरण कार्यक्रम सुरू राहील आणि त्याला गती दिली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.Precaution doses to be now available to 18+ population group from 10th April at private vaccination centres: Ministry of Health
— ANI (@ANI) April 8, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.