पाटना, 26 एप्रिल : देशभरात कोरोनाने हाहाकार उडवला असताना अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र करीही अनेकजण नियमांचं उल्लंघन करीत असल्याचं समोर आलं आहे. त्यात बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण बिहारमध्ये सरकारने नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. सोबतचं अनेक नियम कडक केले आहेत. मात्र बिहारमध्ये हे नियम पायदळी तुटवडे जात असल्याचे चित्र आहे.
अशीच एक घटना नवादा येथून आली आहे. येथे नाईट कर्फ्यू दरम्यान बारगर्ल्सच्या डान्सचा एक व्हिडिओ समोप आला आहे. गावात नाईट कर्फ्यू दरम्यान बारडान्सचं आयोजन केलं होतं. नवादा येथील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. येथे एका कार्यक्रमादरम्यान बारबालांना बोलावून डान्स प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेकडो लोक डान्स पाहण्यासाठी जमा झाले होते.
हे ही वाचा-कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पत्नीची गळा चिरून हत्या, पतीनं स्वतःही दिला जीव
नाईट कर्फ्यूचं उल्लंघन येथे करण्यात आलं आहे. सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले असून पुन्हा एकदा कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अशा प्रकारच्या कृत्यामुळे रुग्णसंख्या अधिक वाढण्याची भीती आहे.
सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉकाडाऊन (Corona Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. तर काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असूनही देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona cases in India) मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, काल (रविवारी) एका दिवसांत तब्बल 3 लाख 54 हजार 531 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread