Home /News /coronavirus-latest-news /

धक्कादायक माहिती समोर! 20 हजार वर्षं जुना आहे कोरोना विषाणू, यापूर्वीही पृथ्वीवर घातलंय थैमान

धक्कादायक माहिती समोर! 20 हजार वर्षं जुना आहे कोरोना विषाणू, यापूर्वीही पृथ्वीवर घातलंय थैमान

कोरोना विषाणू (Corona Virus) तब्बल 20 हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून समोर आला आहे.

    नवी दिल्ली, 26 जून: SARS-CoV-2 मुळे पसरलेल्या कोविड-19 साथीनं (Corona pandemic) सध्या जगभर थैमान घातलं आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात 38 लाखाहून अधिक लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू (Corona patients deaths) झाला आहे. कोरोना विषाणूचा उद्भाव अलीकडेच चीनमध्ये झाला असावा, असा आपला समज आहे. पण कोरोना विषाणू तब्बल 20 हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून (Research) समोर आला आहे. एवढंच नव्हे, तर कोरोना विषाणूनं यापूर्वीही वेगळ्या रुपात अशाचप्रकारे संपूर्ण जगभर थैमान घातलं होतं. त्यावेळीही असंख्य लोकांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला होता. याबाबतच संशोधन अलीकडेच 'करंट बायोलॉजी' या मासिकात प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा उद्भाव 20 हजार वर्षांपूर्वीचा आहे. याबाबतचे अवशेष आधुनिक चीन, जपान आणि व्हियतनाममधील नागरिकांच्या डीएनएमध्ये सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. आधुनिक लोकसंख्येतील 42 जनुकांमध्ये  कोरोना विषाणूचे अनुवांशिक घटक सापडले आहेत. यामध्ये MERS आणि SARS या विषाणूंचा देखील समावेश आहे. यामुळे मागील वीस वर्षात अनेक घातक रोगांचा उद्भाव झाल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. कोरोना विषाणूसारख्या साथीशी भविष्यात कशाप्रकारे लढता येईल, याचा माहिती आपल्याला इतिहासात सापडेलेल्या आनुवांशिक घटकांमुळे होऊ शकते, असंही या संशोधनात म्हटलं आहे. संबंधित साथीचे आजार मानवी इतिहासा एवढेच जुने आहेत. यापूर्वीही मानव जातीनं अनेक जागतिक महामारीचा सामना केला आहे. या संशोधनासाठी जगभरातील 26 देशातील 2,500 लोकांचे जनुके संशोधनासाठी घेण्यात आले होते. मानवाच्या शरीरात 42 वेगवेगळ्या जनुकांमध्ये कोरोना विषाणूच्या कुटुंबाचे अंश आढळले आहेत. हेही वाचा-Delta plus चा धोका वाढत असताना पुण्यात तातडीने सुरू झालं मोठं काम जवळपास 25 हजार वर्षांपूर्वी आशिया खंडातील लोकांचे पूर्वज पहिल्याचा कोरोना विषाणूच्या संपर्कात आले होते. संबंधित 42 आनुवंशिक घटक प्रामुख्याने फुफ्फुसांमध्ये आढळतात. ज्यामुळे कोविड -19 विषाणू फुफ्फुसासाठी सर्वाधिक घातक ठरत आहे. हे आनुवंशिक घटक सध्याच्या साथीच्या रोगासाठी कारणीभूत असणाऱ्या  SARS-Cov-2 या विषाणूच्या थेट संपर्कात येतात, याची पुष्टीही संशोधकांनी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Research

    पुढील बातम्या