नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: कोरोना महामारीच्या काळामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात मास्क (mask), पीपीई किट (PPE Kit), प्लास्टिक ग्लोव्हज् आणि फेसशिल्ड वापण्यात आले. याशिवाय इतर प्लास्टिक वैद्यकीय कचऱ्याचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. परिणामी महामारीच्या काळात जगभरात 80 लाख टन प्लास्टिक कचरा तयार झाला आहे. त्यातला 25 हजार टन प्लास्टिक कचरा (plastic waste) महासागरांमध्ये (oceans) गेला आहे. नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या (National Academy of Sciences) जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, समुद्रात जमा होणारा हा प्लास्टिक कचरा आगामी तीन ते चार वर्षांच्या काळात लाटांच्या माध्यमातून पुन्हा समुद्रकिनारी पोहोचण्याची शक्यता आहे. कचऱ्याचा काही भाग खोल समुद्रात जाईल आणि शेवटी महासागराच्या तळाशी (centres of ocean basins) अडकेल. यामुळं आर्क्टिक महासागरात भरपूर कचरा साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभ्यासकांच्या मते ही बाब जगासाठी नवीन संकटाचं कारण ठरू शकते.
मास्क, ग्लोव्ह्ज आणि फेस शील्डमुळे वाढला कचरा
संशोधकांच्या एका टीमनं महासागरातल्या प्लास्टिकचं संख्यात्मक मॉडेल विकसित केलं आहे. चीनमधलं नानजिंग विद्यापीठ (Nanjing University) आणि अमेरिकेतल्या सॅन दिएगोमधलं कॅलिफोर्निया विद्यापीठ (University of California - UC) या दोन संस्थांच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला.
हेही वाचा- कोविड -19 विरूद्ध असलेली Covaxin लसही 77.8% प्रभावी, लॅन्सेटच्या अभ्यासात माहिती उघड
आशियामध्ये सर्वांत जास्त कचऱ्याची निर्मिती
संशोधकांनी आपल्या अभ्यासामध्ये महामारीच्या सुरुवातीपासून (2020) ते ऑगस्ट 2021 पर्यंतचा डेटा समाविष्ट केला आहे. त्यात असं आढळून आलं, की महासागरात जाणारा बहुतांश प्लास्टिक कचरा आशिया खंडातून येत असून, त्यामध्ये रुग्णालयातल्या कचऱ्याचं प्रमाण लक्षणीय आहे. साथीच्या काळात प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर द्यावा लागेल. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा- देशात Corona Virus नं पुन्हा वाढवला तणाव, 24 तासात मृतांचा आकडा धक्कादायक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Plastic