Corona: रशियानंतर आता 'या' देशानं लावला नंबर, आपत्कालीन स्थितीत 2 लशींना मंजुरी

Corona: रशियानंतर आता 'या' देशानं लावला नंबर, आपत्कालीन स्थितीत 2 लशींना मंजुरी

22 जुलैपासून ही चाचणी सुरू असून अद्याप एकानंही ताप आल्याचा दावा केला नाही.

  • Share this:

बिजिंग, 24 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. यामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. काही निवडक कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या दोन लशींना आपत्कालीन परिस्थित तातडीनं वापर करण्यासाठी चीनंने मंजुरी दिली आहे. आपत्कालीन स्थित ही लस वापरण्याची परवानगी एका आरोग्य अधिकाऱ्यानं दिली आहे. ही लस दिली तरीही या लोकांना कोरोनाचं संक्रमणाचा धोका अनिश्चित काळासाठी सर्वाधिक असू शकतो अशीही माहिती या अधिकाऱ्यानं दिली आहे.

चीनच्या कोरोना व्हायरस लसीकरण विकास टास्क फोर्सचे प्रमुख झेंग झोंगवेई यांनी शनिवारी सरकारी सीसीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय नियम पाळून ही लस दिली जाणार आहे. याशिवाय लस दिल्यानंतर रुग्णांची निरीक्षणं नोंदवण्यात येणार असून त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात येईल. या लशीचे होणारे दुष्परिणाम आणि नुकसान याचा विचार करून एक विशेष पॅकेज तयार करण्यात आलं आहे. त्याामुळे आपत्कालीन स्थितीत ही लस दिल्यानंतर योग्य पद्धतीनं लशीकरण केलेल्यांपर्यंत इतर सुविधाही पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

हे वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी 50 टक्के लोकांना दिलं होमियोपॅथी औषध, झाला वाद

चीनमधील दोन्ही लशींना वैद्यकीय चाचणीची परवानगी मिळाली नसतानाही केवळ आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनमध्ये एका लशीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वीपणे सुरू असल्याचा दावा चीननं केला आहे. 22 जुलैपासून ही चाचणी सुरू असून अद्याप एकानंही ताप आल्याचा दावा केला नाही.

कोरोनाच्या लशीमध्ये रशियानं पहिला नंबर लावला असला तरीही ती अजून बाजारात उपलब्ध झालेली नाही. तर रशियानं दुसरी लस तयार करण्याचंही काम सुरू केलं आहे. भारतात तीन लस तयार झाल्या असून सध्या त्यांचं परीक्षण आणि मानवी चाचणी सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 24, 2020, 8:02 AM IST

ताज्या बातम्या