4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस?

कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराच्या कालावधीवरून तुम्हीही गोंधळला आहात का?

कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराच्या कालावधीवरून तुम्हीही गोंधळला आहात का?

  • Share this:
    मुंबई, 21 जून :  आजपासून देशात नवी कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहीम सुरू झाली आहे. 18+ सर्वांना मोफत कोरोना लस (Corona vaccine) दिली जाते आहे. या नव्या मोहिमेमुळे कोरोना लसीकरणाला वेग आला आहे. बहुतेकांनी आज कोरोना लशीचा पहिला डोस (Corona vaccine dose) घेतला आहे. पण आता कोरोना लशीचा दुसरा डोस (Corona vaccine second dose) नेमका कधी घ्यावा असा प्रश्न उपस्थित होतोच. कारण काही दिवसांपूर्वीच कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतरावरून ज्या बातम्या समोर येत होत्या त्यावरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भारतात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या कोरोना लशी दिल्या जात आहे. सुरुवातीला या दोन्ही लशींचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जात होते. पण यानंतर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर बदलण्यात आले. सुरुवातीला 28, त्यानंतर 6 ते 8 आठवडे आणि मग 12 ते 16 आठवड्यांनी दुसरा डोस घेण्यास सरकारने सांगितलं. पण यानंतर नुकतंच NITAG समितीने आपण 12 ते 16 आठवड्यांनी लस घेण्याची शिफारस केली नव्हती, सरकारने स्वत:च हा कालावधी वाढवला, असं स्पष्ट केलं आहे. पण आता कोविशिल्डचा दुसरा डोस नेमका कधी घ्यावा, तो लवकर घेतला किंवा उशिरा घेतला तर त्याचा कसा परिणाम होईल, असे बरेच प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सर्वसामान्यांच्या मनातील या प्रश्नाचं निरसन केलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हवर त्यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, "ब्रिटनमध्ये काही लोकांनी या लशीचा दुसरा डोस 4 आठवड्यांनी, काही जणांनी 6 आठवड्यांनी तर काहींनी 8 आठवड्यांनी घेतले. या लोकांच्या शरीरात किती अँटिबॉडीज तयार होतात याचं परीक्षण करण्यात आलं. त्यावेळी जितकी उशिरा लस घेऊ तितक्या अँटिबॉडीज जास्त वाढत आहेत, असं संशोधकांनी दिसून आलं आणि त्यामुळे भारतात या लशीच्या दोन डोसमधील अंतर 4 आठवड्यांवरून सहा ते आठ आठवडे करण्यात आलं" हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर ताप आला तर कोणतं औषध घ्यायचं? "यानंतर ब्रिटनमध्येच लशीमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीज किती दिवस टिकतात हे पाहिलं तेव्हा दुसरा डोस 12 आठवड्यांनी घेतला तर  पहिल्या डोसमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीज सर्वात जास्त असतात आणि 16 आठवड्यांपर्यंत त्या कायम राहतात आणि त्यानंतर कमी होतात, असं दिसून आलं. हे संशोधन लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालं आणि जागतिक आरोग्य संघटनेनंही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे", असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं. डॉ. भोंडवे पुढे म्हणाले, "भारतात कोरोना लशीचा तुटवडा आहे, त्यात उशिरा डोस दिले तर त्याचा अधिक फायदाही होतो आहे. शिवाय अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ.  अँथनी फाऊची यांनीसुद्धा लशीचा तुटवडा असेल तर १२ आठवड्यांपर्यंत लांबवण्यास हरकत नाही असं म्हटलं, असं भारताला सूचवलं होतं. त्यामुळे संशोधनानुसार भारतातही कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा विचार सरकारने केला. तशी चर्चाही केली आणि कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर  12 ते 16 आठवड्यांनी वाढवलं. पण सरकारने हा निर्णय नेमका कसा घेतला हा जाहीर न केल्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले" हे वाचा - चिंताजनक! महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण "आता सर्वसामान्यांनी नेमका लशीचा डोस कधी घ्यावा. तर खरंतर 12 ते 16 आठवडे हा कालावधी योग्य आहे. कोरोना लशीचा दुसरा डोस इतक्याच कालावधीने घ्या. खरंतर हे फायद्याचं आहे. यामुळे कोरोनापासून जास्त संरक्षण मिळेल. शरीरात 80 ते 90 टक्के अँटिबॉडीज तयार होती. शिवाय ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सवरही प्रभावी आहे", असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published: