कोरोना लस घेतल्यानंतर काही सौम्य दुष्परिणाम दिसून येतात. त्यापैकीच एक म्हणजे ताप येणं. कोरोना लस घेतल्यानंतर ताप आला तर अशावेळी काय करावं, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतं.
लसीकरण केल्यावर लस घेतलेल्यांनी ताप येत असल्याची तक्रार केली आहे. ताप येण्याबरोबर अंग दुखीही जाणवते. डॉक्टरांच्या मते एखादी लस जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा आपलं शरीर त्यावर रिऍक्शन (Reaction) देतं.
लस घेतल्यावर 100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप आल्यास पॅरासिटेमॉलची 500 मिलिग्रॅमची एक गोळी घ्यावी, असा सल्ला महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं. मात्र ताप येईल म्हणून लसीकरणाआधी ती मुळीच घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पॅरसिटामोलसारख्या गोळ्या घेतल्यास थोडं बरं वाटतं. पण तुम्हाला औषधाशिवाय हा त्रास कमी कसा कारायचा असेल तर यासंदर्भात तज्ज्ञांचं मत काय आहे याबद्दल अमर उजालाने एम्स रुग्णालयाच्या डॉक्टर आयशी पाल यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे.
जास्त ताप येत असेल तर, डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. थंड पाण्याने अंग पुसण्यानेही फायदा होते.
थकवा जाणवत असेल तर पौष्टीक आहाराबरोबरच शरीरातील पाण्याची मात्रा चांगली रहावी यासाठी भरपूर पाणी प्या. नुसतं पाणी पिणं शक्य नसेल तर, लिंबू सरबत, ज्युस यांचं सेवन करा.
लसीकरणानंतर एक किंवा दोन दिवस त्याचे साईड इफेक्ट जाणवतात. पण जास्त त्रास जाणवला तर घरीच उपचार करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या.