• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Corona Update: देशात एका दिवसात 1 लाख 69 हजार रुग्णांची नोंद, मृतांच्या संख्येत दुप्पट वाढ

Corona Update: देशात एका दिवसात 1 लाख 69 हजार रुग्णांची नोंद, मृतांच्या संख्येत दुप्पट वाढ

रविवारी नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येनं (Corona Update) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारी एका दिवसात 1,69,899 नवीन कोरोना रुग्णांची नोंद (Corona Cases in India) झाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 12 एप्रिल : कोरोनाचा (Coronavirus) प्रसार मागच्या आठवड्यात प्रचंड वेगानं झाला आहे. तर, रविवारी नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येनं (Corona Update) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी एका दिवसात 1,69,899 नवीन कोरोना रुग्णांची नोंद (Corona Cases in India) झाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर, देशात रविवारी 904 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यातील सात दिवसातील सहा दिवस दररोज कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत आहे, तर दुसरीकडे चिंताजनक बाब म्हणजे रिकव्हरी रेट म्हणजेच बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढवल्यामुळे कोरोनासोबत लढा देण्यासाठी याचा फायदा होणार आहे. कोरोना ट्रॅक कोविड-19 इंडियाच्या म्हणण्यानुसार, देशात पाच एप्रिलच्या सकाळपर्यंत 7,37,872 अॅक्टिव्ह रुग्ण होते. 11 एप्रिलला रात्रीपर्यंत हा आकडा 11,89,856 वर पोहोचला आहे. म्हणजेच मागील एका आठवड्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत तब्बल पन्नास टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी सकाळपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची दर 8.29 टक्के राहिला. हा दर सात दिवसांपूर्वी 5.86 इतका होता. Maharashtra Corona :राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63,894 वर, 349 मृत्यू मृत्यूदर वाढला - कोरोना ट्रॅक कोविड - 19 इंडियाच्या आकडेवारीनुसार, 5 एप्रिलच्या सकाळपर्यंत 24 तासात देशात 477 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात हा आकडा 838 वर पोहोचला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात दररोज जितके रुग्ण आढळत आहेत, त्यातील 1.27 टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. पाच एप्रिलला मृत्यूदर 1.31 इतका होता. जगभरातील स्थिती - दररोज नोंद होणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आणि अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत देश सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: