Home /News /coronavirus-latest-news /

हृदयद्रावक! दौंडमध्ये तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत; हतबल पत्नीला अश्रू अनावर

हृदयद्रावक! दौंडमध्ये तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत; हतबल पत्नीला अश्रू अनावर

पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडली आहे. येथील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतरही तीन दिवस उपचारा अभावी राहावं लागलं आहे. आपल्या पतीची प्रकृती बिघडताना पाहून संबंधित रुग्णाच्या हतबल पत्नीला अश्रू आवरता येत नाहीयेत.

    सुमित सोनवणे, दौंड, 12 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना स्थिती (Corona Pandemic) बिघडतच चालली आहे. पुणे शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णांची स्थिती आणखीच दयनीय आहे. आपल्या जीवाभावाच्या लोकांना कोरोना झाल्यानंतर (Corona infection) त्यांच्या उपचारासाठी नातेवाईकांची प्रचंड ओढाताण होतं आहे. तर काहींची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यानं खासगी रुग्णालयात उपाचार घेणंही त्यांना परवडणारं नाही. अशात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसत आहे. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडली आहे. येथील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतरही तीन दिवस उपचाराअभावी राहावं लागलं आहे. आपल्या पतीची प्रकृती बिघडताना पाहून संबंधित रुग्णाच्या हतबल पत्नीला अश्रू आवरता येत नाहीयेत. ही हृदयद्रावक घटना दौंड उपविभागीय रेल्वे रुग्णालयात घडली असून पीडित रुग्ण हा रेल्वे विभागाचा कर्मचारी आहे. दौंडमधील उपविभागीय रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड होत आहे. येथील कोरोना रुग्णाला उपचाराअभावी रुग्णालयाच्या आवरात बसून राहण्याची वेळ आली आहे. येथील दोन कर्मचाऱ्यांची तीन दिवसापूर्वी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर उपचार सुरू केलेला नाही. दौंडमधील सरकारी आणि खाजगी रुग्णालयातही बेड मिळत नाहीयेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय होतं असून नातेवाईंकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. हे ही वाचा-संतापजनक! पुण्यात लस पुरवठा करण्यासाठी खासगी रुग्णालयांना मागितली लाच खरंतर, दौंडमधील संबंधित रेल्वे रुग्णालय नॉन कोविड असल्यानं आणि संबंधित कोरोना रुग्ण पुणे रेल्वे डिव्हिजनचे कर्मचारी असल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. दौंड रेल्वे रुग्णालय सोलापूर डिव्हिजनच्या हद्दीत येते. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र एकट्या पत्नीनं रुग्णाला पुण्याला कसं घेऊन जायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे संबंधित महिला हतबल झाली आहे. तसेच आपल्या रुग्णाची प्रकृती नाजूक होत चालल्यानं त्यांना अश्रू रोखता येत नाहीयेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Pune

    पुढील बातम्या