Home /News /coronavirus-latest-news /

एका खोलीचं घर, गावातही जागा मिळेना; अकरा दिवस झाडावरच राहिला कोरोना रुग्ण

एका खोलीचं घर, गावातही जागा मिळेना; अकरा दिवस झाडावरच राहिला कोरोना रुग्ण

18 वर्षाच्या तरुणाला कोरोनाची (Coronavirus) लागण झाली. मात्र, घरात आयसोलेट (Isolate) होण्यासाठी जागाच नसल्यानं त्यानं अकरा दिवस झाडावरच (Tree) काढले.

    हैदराबाद 17 मे : देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Coronavirus Second Wave) थैमान घातलं आहे. रुग्णालयांमध्ये बेड, औषधं आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशात गंभीर लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) राहाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अशी अनेक कुटुंब असतात जी केवळ एका खोलीत राहात असतात. अशात कोरोना रुग्णांना आयसोलेट करण्यासाठी घरात जागाच शिल्लक नसते. याच सर्व अडचणींदरम्यान तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील एका रुग्णानं आयसोलेट होण्यासाठी एक वेगळाच पर्याय शोधून काढला. अठरा वर्षाच्या या तरुणानं कोरोनाची लागण झाल्यानंतर एका झाडावर अकरा दिवस घालवले. द प्रिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण नालगोंडा जिल्ह्यातील अंदरुनी परिसरातील कोठानंदीकोंडा येथील आहे. अठरा वर्षाचा शिवा नावाचा हा तरुण हैदराबादमध्ये ग्रॅज्युएशन करतो. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तो आपल्या घरी परतला. कोरोनाची हलकी लक्षणं दिसल्यानंतर त्यानं आपली चाचणी केली. चार मे रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट आल्यानंतर त्याला सांगण्यात आलं, की तू घरीच आयसोलेट हो आणि तुझ्या घरच्यांपासून दूर राहा. मात्र, घरातील परिस्थिती आणि गावात आयसोलेशन सेंटर नसल्यानं त्यानं झाडावरच आयसोलेट होण्याचं ठरवलं आणि झाडावरच त्यानं अकरा दिवस घालवले. या तरुणानं सांगितलं, की गावात एकही आयसोलेशन सेंटर नाही. कुटुंबात चार सदस्य आहेत. माझ्यामुळे मी त्यांनाही कोरोनाबाधित करू शकत नाही. त्यामुळे, मी झाडावरच आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला. त्यानं सांगितलं, की गावातील वॉलंटियर्सनं सरपंचांना मी पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं की नाही हे मला माहिती नाही. मात्र, गावातील कोणीच माझ्या मदतीसाठी पुढे आलं नाही. ते सर्वजण कोरोनाला घाबरत आहेत, त्यामुळे आपल्या घरातून कोणी बाहेरही निघत नाही. शिवानं झाडाच्या फांद्यावरच गादी टाकली आहे. हे झाड त्याच्या घरासमोरच आहे. त्यानं एक दोरी आणि बादलीच्या सहाय्यानं रोजचं जेवण आणि औषधं घेण्याची व्यवस्था केली होती. या काळात आपला बहुतेक वेळ त्यानं मोबाईलमध्येच घालवला. कोठानंदीकोंडामध्ये जवळपास 350 कुटुंब राहातात. हा परिसर छोट्या आदिवासी गावांमधील एक आहे. इथे प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील गावापासून पाच किलोमीटर दूर आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona patient, Isolation

    पुढील बातम्या