Home /News /coronavirus-latest-news /

बहिरं बनवतोय कोरोनाव्हायरस; नाक, जिभेनंतर आता कानांवरही गंभीर दुष्परिणाम

बहिरं बनवतोय कोरोनाव्हायरस; नाक, जिभेनंतर आता कानांवरही गंभीर दुष्परिणाम

सध्या कोरोना रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसत आहेत, जी याआधी दिसली नाहीत.

    मुंबई, 08 जून: चव न लागणं, वास न येणं अशी कोरोनाची लक्षणं (Coronavirus symptoms) आपल्याला माहिती आहेतच. दरम्यान आता कोरोनाव्हायरस हा नाक, जिभेप्रमाणे कानांवरही गंभीर दुष्परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये बहिरेपणाचं (Deafness) लक्षण दिसून आलं आहे. सध्या कोरोना रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसत आहेत, जी याआधी दिसली नाहीत. यामध्ये बहिरेपणा, पोटासंबंधी गंभीर आजार, रक्ताच्या गुठळ्या होऊन गँगरीन (Gangrene) होणं, यांचा समावेश आहे. कोरोनाच्या नव्या लक्षणांचा संबंध डॉक्टर कोरोनाच्या  भारतातील डेल्टा वेरिएंटशी जोडत आहे. कोरोनाचा डेल्टा  म्हणजे B.1.617.2 व्हेरिएंट गेल्या सहा वर्षांत 60 देशांमध्ये थैमान घालतो आहे. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत या व्हेरिएंटची संक्रमणाची तीव्रता, लशीचा प्रभाव कमी करणं अशा अनेक कारणांमुळे या स्ट्रेनचा प्रभाव गंभीर होऊ शकतो. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील अभ्यासानुसार या स्ट्रेनमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका जास्त वाढतो आहे. हे वाचा - मोठी बातमी! पुण्यातील पाण्यातही सापडला कोरोनाव्हायरस; संसर्गाचा धोका किती? पोटात वेदना, उलटी, भूक कमी होणं, बहिरेपणा अशी लक्षणं नव्या कोरोना रुग्णांमध्ये पाहायला मिळत आहेत. काही रुग्णांमध्ये मायक्रो थ्रोंबी आणि रक्ताच्या गुठळ्या पाहायला मिळत आहेत. यामुळे गँगरीन होतं. ज्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या आहे, त्यांच्यामध्ये इतर लक्षणं नाहीत. याला नवा व्हेरिएंट कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. काही रुग्णांच्या तर नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, ज्या आतड्यांमधील रक्तापर्यंत पोहोचतात. ज्यामुळे रुग्णाला पोटदुखी जाणवते. दुसऱ्या लाटेतील प्रत्येक रुग्णामध्ये वेगळी लक्षणं पाहायला मिळत आहेत. हे वाचा - कत्ल की रात है। 5 मिनिटासाठी ऑक्सिजन बंद अन् 22 रुग्णांचा मृत्यू; VIDEO VIRAL एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार चेन्नईतील अपोल रुग्णालययातील संसर्गजन्य आजारांचे डॉ. अब्दुल गफूर यांनी सांगितलं, B.1.617 चा नव्या लक्षणांशी काही संबंध आहे की नाही, हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला अधिक अभ्यासाची गरज आहे. महासाथीच्या सुरुवातीच्या लाटेच्या तुलनेत यावेळी डायरियाचे रुग्ण अधिक पाहायला मिळत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या