नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : भारतात प्रौढ व्यक्तींना कोरोना लशीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण लहान मुलांना सध्या फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही कोरोना लस दिली जाते आहे. आता लहान मुलांसाठीही आणखी एका कोरोना लशीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कॉर्बेवॅक्स (Corbevax) कोरोना लसही लहान मुलांना (Corbevax corona vaccine for children) दिली जाणार आहे. ही लस लहान मुलांना देण्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) परवानगी दिली आहे. कॉर्बेवॅक्स हे मेड इन इंडिया लस आहे. भारतातील ही तिसरी स्वदेशी लस आहे. हैदराबादमधील बायोलॉजिकल ई (Biological E) कंपनीद्वारे ही लस तयार करण्यात आली आहे. कोविड-19 विरुद्ध भारतात विकसित केलेली ही पहिली RBD आधारित लस आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने यापूर्वीच 28 डिसेंबर रोजी आपत्कालीन परिस्थितीसाठी कॉर्बेवॅक्सला मर्यादित आधारावर मान्यता दिली आहे. आता डीसीजीआयने 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी या लशीला परवानगी दिली आहे.
CDSCO च्या कोविड-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) 12 ते 18 वयोगटातील बायोलॉजिकल ईके कॉर्बेव्हॅक्सच्या वापरास मान्यता दिली, काही अटींसह मर्यादित आपत्कालीन वापरासाठी देण्याची शिफारस केली. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी डीसीजीआयकडे पाठवण्यात आली होती. हे वाचा - महाराष्ट्रातील डॉक्टरचा कोरोनावर जालीम उपाय; खास मीठ हुंगून बरे झाले हजारो रुग्ण 9 फेब्रुवारी रोजी DCGI ला पाठवलेल्या अर्जात, बायोलॉजिकल ई लि.चे गुणवत्ता आणि नियमन व्यवहार प्रमुख श्रीनिवास कोसाराजू यांनी सांगितले की, कंपनीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 5 ते 18 वर्षे वयोगटातील Corbevax च्या फेज II-III क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी मिळाली. कॉर्बेवॅक्स लस स्नायूद्वारे शरीरात टोचली जाईल आणि 28 दिवसांच्या आत दोन डोस घेतले जातील. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाते.