मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

महाराष्ट्रातील डॉक्टरने शोधला कोरोनावर जालीम उपाय; फक्त हे खास मीठ नाकाने हुंगूनच ठणठणीत झाले हजारो रुग्ण

महाराष्ट्रातील डॉक्टरने शोधला कोरोनावर जालीम उपाय; फक्त हे खास मीठ नाकाने हुंगूनच ठणठणीत झाले हजारो रुग्ण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

अँटिव्हायरल औषधांनीही बरे झाले नाहीत, अशा गंभीर कोरोना रुग्णांना महाडमधील डॉ. हिंमतराव बाविस्कर यांनी आपल्या उपचाराने बरं केलं आहे.

रायगड, 21 फेब्रुवारी : गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ जगभर थैमान घातलेल्या कोरोनावर अद्याप नेमकं औषध मिळालेलं नाही. जगभरात त्यासाठी संशोधन सुरू आहे. पण जे जगभरातील भल्याभल्या शास्त्रज्ञांना जमलं नाही ते महाराष्ट्रातील एका डॉक्टरने करून दाखवलं आहे. या डॉक्टरने कोरोनावर जालीम उपाय शोधून काढला आहे. फक्त एक खास मीठ नाकाने हुंगायला लावून त्यांनी हजारो रुग्ण ठणठणीत बरे करूनही दाखवले आहे. हे डॉक्टर आहेत, डॉ. हिम्मतराव बावस्करांचं (Dr Himmatrao Bavaskar corona treatment). महाडमधील पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर (Dr Himmatrao Bavaskar) विंचूदंश आणि सर्पदंशावरचे प्रभावी औषध शोधून काढणारे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सर्वांना रोगमुक्त करण्याचं ध्येय घेऊन सतत प्रयोगशील राहणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने कोरोनाच्या काळातही उसंत घेतलेली नाही. अँटीव्हायरल (Antiviral Drugs) औषधांनी बरे न झालेले पेशंट्स डॉ. हिम्मतराव बावस्करांकडे आले होते. त्यांना डॉ. बावस्करांनी आपल्या प्रयोगाने बरं केलं आहे. मेथिलिन ब्लू (Corona treatement with methylene blue) हे सिंथेटिक रसायन (Synthetic Chemical) हुंगायला देऊन डॉ. बावसकरांनी या पेशंट्सना बरं केलं आहे. हे वाचा - कोरोनाचा नवीन प्रकार Deltacron किती धोकादायक? काय म्हणतायेत भारतीय शास्त्रज्ञ? डॉ. बावस्कर म्हणाले, 'कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2020 साली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमच्या पेशंट्सना मेथिलीन ब्लू हुंगायला देऊन बरं केलं. या पेशंट्सनी आधी रेमडेसीवीर, फेव्हिपिराविर आणि टॉसिलीझुमॅब ( remdesivir, favipiravir and tocilizumab) अशा अँटीव्हायरल औषधांचे डोसेस घेतले होते; मात्र त्या औषधांनी त्यांना बरं वाटलं नव्हतं.' '2021मध्येही दुसऱ्या लाटेदरम्यान मी 200हून अधिक कोरोना पेशंट्सना या औषधाच्या साह्याने बरं केलं आहे. त्यापैकी काही रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता,' असंही डॉ. बावस्करांनी सांगितलं. काय आहे मेथिलीन ब्लू मेथिलीन ब्लू (Methylene Blue) हे एक प्रकारचं क्लोराइड सॉल्ट असतं. सर्वसामान्यपणे याचा वापर डायमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीमलेरियल, अँटी डिप्रेसंट आणि कार्डिओप्रॉडक्टिव्ह गुणधर्म असतात. हायड्रोक्लोरोक्विन (Hydrochloroquine) या मलेरियावरच्या औषधात, तसंच आयव्हरमेक्टिन (Ivermectin) या अँटीपॅरासायटिक औषधातही याचा वापर केला जातो. मेथिलीन ब्लूची किंमत खूप कमी असते. 10 रुपयांत पाच मिली मेथिलीन ब्लू उपलब्ध होतं. आपल्या देशात कित्येक वर्षांपासून मेथिलीन ब्लूचा वापर अनेक रोगांवरच्या उपचारांसाठी केला जात आहे; मात्र याचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. कारण जास्त प्रमाणात वापरल्यास हे रसायन विषाप्रमाणे काम करतं. कोरोनाचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ लागतो, तेव्हा शरीरातल्या पेशींमध्ये सायटोकाइन स्टॉर्म (Cytokine Storm) होतं. म्हणजेच शरीराची रोगप्रतिकारयंत्रणा शरीराच्याच विरोधात काम करू लागते. यामध्ये ब्रॅडिकिनीनची (Bradykinin) भूमिका महत्त्वाची असते. डॉ. बावस्करांच्या म्हणण्यानुसार मेथिलीन ब्लू हे रसायन ब्रॅडिकिनीनला न्यूट्रलाइज करतं. त्यामुळे ते प्रभावी ठरतं. हे वाचा - आहारासंबंधित ही 2 लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा अलर्ट! असू शकतो ओमिक्रॉनचा धोका त्यांच्या या प्रयोगाची दखल इंटरनॅशनल जर्नलनेही घेतली आहे. डॉ. बावस्करांच्या या कामाबद्दलचा लेख जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केयर (Journal of Family Medicine and Primary Care) या जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे.   त्यांच्या या रिसर्च पेपरमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की ज्या रुग्णांना मेथिलीन ब्लू हुंगायला दिलं होतं, त्यांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यांच्या या प्रयोगांबद्दलचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झालं आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या