मालेगाव, 19 मार्च: गेल्या 14 महिन्यांपासून देशभरात कोरोना विषाणूने (Corona Virus) अक्षरशः हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूने देशातील लाखो नागरिकांचे प्राण (Corona Deaths) घेतले आहे. तर दुसरीकडे कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम (Corona Vaccination) हाती घेतली आहे. पण अद्यापही कोरोना लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये अनेक प्रकारचे संभ्रम (Confusion over corona vaccine) आहेत. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, याची लेखी हमी द्या, अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत. यामध्ये मुस्लीम समुदायामध्ये (Muslim Community) लशीबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.
खरंतर, मालेगावमध्ये (Malegaon) गेल्या 17 दिवसांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. दरम्यानच्या काळात शहरातील तब्बल 2 हजार 451 ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. यामध्ये लसीकरण करून घेण्याऱ्या मुस्लीम समुदायातील ज्येष्ठ नागरिकांच्या संख्या अत्यल्प आहे. मालेगावात कोरोना लस घेणाऱ्या मुस्लीम समुदायातील ज्येष्ठ नागरिकांचा आकडा दोन अंकी देखील नाही, अशी धक्कादायक माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे. लस घेतल्यानंतर कोरोना विषाणूची लागण होणार नाही याची लेखी लिहून द्या, अशी मागणी नागरिक करत असल्याची माहितीही संबंधित कर्मचारी देत आहेत.
खरंतर कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतचं मालेगाव शहरातील मुस्लिमबहुल परिसर कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनला होता. त्यानंतर हा कोरोना इतरात इतरत्र पसरला होता. अजूनही या परिसरात कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळत आहेत. 1 मार्चपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे, असं असलं तरी मालेगावात ज्येष्ठांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, असं लिहून दिलं तर आपण लस घेवू अशी आडमूठ भूमिका स्थानिक नागरिक घेत असल्याची तक्रार आरोग्य कर्मचारी करत आहेत.
हे ही वाचा -नागपूरवरील संकट गडद; 24 तासांत 35 जणांचा मृत्यू, कोरोनाची धक्कादायक आकडेवारी
सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, मालेगावात कोरोना लसीकरणाची परिस्थिती पोलिओ लस सारखी आहे. देशातून पोलिओला हद्दपार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकार पोलिओ लसीकरण राबवत आहे, मात्र मालेगावातील बऱ्याच बालकांनी अजून एकदाही पोलिओ लस घेतली नाही. शहरात साधारणातः साडे तीन ते चार हजार बालकांनी अद्याप पोलिओ लसीकरण घेतलं नाही. धर्मगुरू आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार प्रबोधन करून देखील मालेगावात पोलिओचे शंभर टक्के लसीकरण कधीच पूर्ण झालं नाही. पोलिओ लसीकरणाप्रमाणेचं मालेगावात कोरोना लसीकरणाची परिस्थिती बनत चालली आहे. त्यामुळे मालेगावात कोरोना नियंत्रणात आणणं प्रशासनासाठी त्रासदायक ठरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Malegaon, Nashik