मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Covid-19 New symptoms: ताप, सर्दी-खोकल्याखेरीज कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ही नवी लक्षणं; दुर्लक्ष नको काळजी घ्या

Covid-19 New symptoms: ताप, सर्दी-खोकल्याखेरीज कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ही नवी लक्षणं; दुर्लक्ष नको काळजी घ्या

रुग्णांची संख्या जशी वाढत आहे, तशी त्यांच्यामध्ये दिसून येणारी लक्षणंही बदलत आहेत. ताप, सर्दी, घसा दुखणे, खोकला याखेरीज काही नवी लक्षणं (Coronavirus Omicron new symptoms) डॉक्टरांकडे नोंदवली जात आहेत.

रुग्णांची संख्या जशी वाढत आहे, तशी त्यांच्यामध्ये दिसून येणारी लक्षणंही बदलत आहेत. ताप, सर्दी, घसा दुखणे, खोकला याखेरीज काही नवी लक्षणं (Coronavirus Omicron new symptoms) डॉक्टरांकडे नोंदवली जात आहेत.

रुग्णांची संख्या जशी वाढत आहे, तशी त्यांच्यामध्ये दिसून येणारी लक्षणंही बदलत आहेत. ताप, सर्दी, घसा दुखणे, खोकला याखेरीज काही नवी लक्षणं (Coronavirus Omicron new symptoms) डॉक्टरांकडे नोंदवली जात आहेत.

  • Published by:  News18 Web Desk

नवी दिल्ली, 11 जानेवारी - कोरोना विषाणूचा (Corona virus) विळखा सध्या जगासह देशात आवळत चालला आहे. देशात कोरोनाची तिसरी ( Corona third wave) लाट आल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. रुग्णांची संख्या जशी वाढत आहे, तशी त्यांच्यामध्ये दिसून येणारी लक्षणंही बदलत आहेत. सर्दी-पडसे, खोकला, घसा, डोकेदुखी आणि पाठदुखी अशी काही लक्षणं (Corona Symptoms) बाधितांमध्ये दिसत असताना आता नवी लक्षणं दिसून येत आहे.

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये (Bangalore) कोरोनाची लागण झालेल्या आणि विलगीकरणात (Isolation) असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पायांना (बोटांपासून गुडघ्यापर्यंत) तीव्र वेदना आणि घशात खवखव झाल्याच्या तक्रारी आहेत. कोविड झालेल्या रुग्णांना ही लक्षणं आढळल्याचं अनेक डॉक्टरांनी सांगितले. परंतु ती कशाची लक्षणं आहेत याबद्दल खात्रीलायक सांगू शकले नाहीत. अशी बातमी News18.com ने दिली आहे.

मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापक आणि कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त नोडल अधिकारी डॉ. असिमा बानू सांगतात, वाणी विलास हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तसेच आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी पायदुखीच्या (Leg pain) तसेच घशात खवखव (etching Throat)  होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. घशात फक्त एकच दिवस खवखव होते, तर पाय दुखण्याच्या तक्रारी तीन दिवसांपर्यंत राहतात, नंतर पाय दुखणे थांबते. पी. जी. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना 5 जानेवारीला कोरोनाची लागण झाल्यानंतर 6 जानेवारीला त्यांना पायाचे दुखणे सुरू झाल्याची पुष्टी मिळाली.

सामान्य सर्दी कोरोनाला रोखण्यास कशी करते मदत?

विद्यार्थिनी म्हणाली, तिला पायाच्या मांड्यांपासून बोटांपर्यंत काटेरी वेदना झाल्या. आधी एका पायापासून सुरुवात झाली. हळूहळू दोन्ही पायांना वेदना सुरू झाल्या. आणखी एका विद्यार्थ्याला नवीन वर्षानिमित्त मित्राच्या घरी जाऊन आल्यानंतर ३ जानेवारीला कोरोनाची बाधा झाली. घशात दुखू लागल्याने त्याला गिळता येत नव्हते. तो म्हणाला, की त्याला सर्दी झाली नव्हती, पण लागण झाल्याच्या तिसर्या दिवशी तो पायदुखीने त्रस्त झाला होता.

डॉ. बानू सांगतात, ही लक्षणं साधारण प्राथमिक संपर्कात आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना थकवा आणि ही लक्षणं दिसून आली. ज्यांना घसादुखीची लक्षणं दिसत असतील त्यांनी बेटाडाइनच्या गुळण्या कराव्यात. तसेच पायाच्या दुखण्यासाठी पॅरेसिटेमॉल (Dolo-650) ही गोळी घ्यावी. ज्यांना गंभीर लक्षणं असतील त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

संसर्गापासून असा करा बचाव; WHO ने निरोगी-ठणठणीत राहण्यासाठी सांगितल्या या टिप्स

नॅशनल वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, झोन कोविड स्टडी अॅपच्या नव्या डेटामध्ये नमूद करण्यात आले आहे की, ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये दोन नवीन लक्षणं दिसून आली आहेत. कोरोनाची बाधा झाल्यानंतर सामान्य लक्षणाव्यतिरिक्त शरीरावर वेगळे परिणाम दिसून आले आहेत. किंग कॉलेज ऑफ लंडनमधील जेनेटिक अॅपिडेमिओलॉजी विभागाचे प्राध्यापक टिम स्पेक्टर सांगतात, अनेक रुग्णांना बाधा झाल्याच्या पहिल्या स्टेजला मळमळ होण्यासारखे लक्षण आढळले आहे.

एका यूट्यूब व्हिडिओवर बोलताना ते म्हणाले, की कोरोना लशीचे दोन्ही डोस किंवा बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये ही लक्षणं खूपच साधारण दिसत आहेत. परंतु त्यांचा प्रभाव खूप सौम्य आहे. ओमायक्रोनबाधितांमध्ये पाठीचे दुखणे हे एक आणखी लक्षण दिसून आले आहे.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Omicron