बीजिंग, 28 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) थैमानाला दीड वर्षांहून अधिक काळ लोटला. किती तरी महिन्यांचा लॉकडाऊन, ज्यामुळे लोक घरात बंदिस्त होते. आता कुठे बहुतेक देशातील निर्बंध हळूहळू शिथील होऊ लागले. लोक मोकळा श्वास घेऊन लागले. तोच आता कोरोनाचं चक्र पुन्हा फिरल्याचं दिसतं आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला आहे (Coronavirus in china) आणि तिथं पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे (Corona lockdown in china).
कोरोनाचा सर्वात आधी विस्फोट चीनमध्येच झाला होता. तिथंच आता पुन्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. परिस्थिती इतकी भयंकर आहे की एका आठवड्यातच तीन शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. गुरुवारी चीन-रशियाच्या सीमेवरील हेइलॉन्गजियांग प्रांतातील हेईए शहर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. हे आठवडाभरात लॉकडाऊन लागलेलं तिसरं शहर आहे.
माहितीनुसार चीनच्या 11 प्रांतामध्ये कोरोनाची प्रकरणं सापडली आहेत. हे संक्रमण पाहता अधिकाऱ्यांनी 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं लानझाऊ आणि एजिनमध्ये लॉकडााऊन लागू केला. लानझाऊ शहर मंगळवारपासून बंद आहे, तिथं फक्त एका प्रकरणाची नोंद झाली आहे. 35,000 लोकसंख्या असलेल्या एजिनमध्ये सात प्रकरणं आढळली आहेत.
हे वाचा - Corona Returns: ठाकरे सरकारमधील मोठ्या मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग
गुरुवारी आणखी एक प्रकरण समोर आल्यानंतर हेइए सिटीत अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. बस आणि टॅक्सी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. गाड्यांना शहराबाहेर जाण्यास परवानगी नाही. बीजिंगसह किती तरी शहरातील उच्चभ्रू परिसरात लॉकडाऊन लागू करून लोकांना घरात कैद करण्यात आलं आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या सीमेजवळील शहरात 16 लाख लोकांची चाचणी सुरू करण्यात आली आहे. संक्रमित रुगणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आलेला आहे. फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये विंटर ऑलिम्पिक आयोजित केलं जाणार आहे. त्याआधीच सरकार कोरोना दहशतीचा खात्मा करू पाहत आहे. यासाठी ससरकार झिरो टॉलरेन्स नीतीवर काम करत आहे.
हे वाचा - कोरोना व्हायरसच्या नव्या घातक Variant चा धोका, महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये शिरकाव
चीनमध्ये पुन्हा कोरोना धुमाकूळ घालतो आहे. त्यामुळे भारतातही पुन्हा कोरोनाचा विस्कोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सणासुदीच्या काळ पाहता याचा धोका अधिकच आहे. त्यामुळे निर्बंध शिथील झाले तर नियमांचं उल्लंघन करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona, Coronavirus