मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Covid 19 Returns: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना Corona चा संसर्ग

Covid 19 Returns: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना Corona चा संसर्ग

Corona Returns: महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये, मंदिरे, सिनेमागृह सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सणासुदीत आता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती.

मुंबई, 28 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग कमी होत असल्याने शाळा, मॉल्स, सिनेमागृहे, मंदिरे सुरू करण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होतो की काय अशी चिंता सतावू लागली. आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला असून तो व्हेरिएंट आता भारतातही आढळला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याच दरम्यान आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. (Maharashtra Home Minister Dilip Walase Patil tests positive for covid19)

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचं आवाहन

नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असंही दिलीप वळसे पाटील यांनी आवाहन केलं आहे.

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच मुंबई पोलीस आयुक्त ही दिलीप वळसे पाटील यांना भेटले होते.

वाचा : किरण गोसावीचा अटक होण्यापूर्वीचा VIDEO आला समोर, केली 'ही' मागणी

राज्यातील कोरोनाची स्थिती

27 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यात 1485 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 2536 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64,43,342 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्य स्थितीत राज्यात एकूण 19,480 कोरोना बाधित रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.53 टक्के इतका आहे.

राज्यातील लसीकरणाची स्थिती

27 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यात 4,74,928 जणांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 9,62,83,551 लसीकरण झाले आहे.

First published:

Tags: Coronavirus, महाराष्ट्र