नवी दिल्ली, 23 मे: देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसरी लाटेतून होणारा संसर्ग आणि मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सोबतच नव्या आजारांमध्येही वाढ होत असल्याचं समोर येत आहे. म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच ब्लॅक फंगसमुळे (Black Fungus) अनेकांनी आपले डोळे (Eyes) गमावले आहेत. अनेकांचा तर यात जीवही गेला आहे. राज्यात या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात याला महासाथ घोषित करण्यात आलं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ब्लॅक फंगसच्या रुग्णवाढीचं कारण मास्क (Mask) मागे असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्लॅक फंगसच्या मागे मास्कमधील अस्वच्छता मोठं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळेच ब्लॅक फंगसच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे. हिंदुस्तानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वरिष्ठ नेत्र रोग विशेषज्ञ डॉ.एस.एस.लाल यांनी सांगितलं की, म्यूकर मायकोसिस होण्यामागे अधिक काळासाठी वापरला जाणारा मास्क कारणीभूत असल्याची शक्यता आहे. मास्कवर जमा झालेली अस्वच्छता, आणि कणांमुळे डोळ्यात फंगस इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. सोबत मास्कमध्ये ओलावा असला आणि अशा मास्कचा वापर केल्यासही इन्फेक्शन होऊ शकतं.
हे ही वाचा-कोरोनामुक्त झालेल्या 96 टक्के लोकांमध्ये वर्षभरानंतरही पुरेशा अँटिबॉडी
डॉ. लाल यांनी पुढे सांगितलं की, कोविड-19 रुग्णांना उपचारादरम्यान बराच काळासाठी ऑक्सिजन (Oxygen) दिल्यामुळेही हा फंगल इन्फेक्शन होऊ शकतो. याशिवाय कोरोना रुग्णांना स्टेरॉइड जास्त प्रमाणात दिले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
काय आहेत प्राथमिक लक्षणं
हा आजार डोक्यांपर्यंत पोहोचण्याची सुरुवात डोळे लाल होण्यापासून होतात. याशिवाय डोळ्यातील पाणी येणं, कंजक्टिवाइटिससारखी लक्षणं दिसतात. त्यानंतर डोळ्यात वेदना होणे आणि कालांतराने दृष्टीही जाऊ शकते. तसं पाहता या फंगसच्या इन्फेक्शची सुरुवात नाकापासून होते. यामुळे नाकातून ब्राऊन वा लाल रंगाचा म्युकस बाहेर निघतो. त्यानंतर हा डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि यानंतर मेंदू आणि नर्व्हस सिस्टमपर्यंत पोहोचल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होतो.
पावसाळ्यात ब्लॅक फंगस पसरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना दररोज मास्क डेटॉलने धुवून उन्हात वाळत घालावे. याशिवाय मास्क अन्य कपड्यांसोबत धुवू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid-19 positive