मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

करा कोरोनाशी दोन हात; हा Immunity Booster करेल तुमची मदत

करा कोरोनाशी दोन हात; हा Immunity Booster करेल तुमची मदत

डॉ. अनिश देसाई (एमडी, एफसीपी, पीजीडीएचईपी) संचालक स्ट्रॅटेजिक मेडिकल अफेअर्स आणि श्री. सुशांत रावराणे, सह-संस्थापक, संचालक, अड्रॉइट बायोमेड लिमिटेड यांचा लेख

डॉ. अनिश देसाई (एमडी, एफसीपी, पीजीडीएचईपी) संचालक स्ट्रॅटेजिक मेडिकल अफेअर्स आणि श्री. सुशांत रावराणे, सह-संस्थापक, संचालक, अड्रॉइट बायोमेड लिमिटेड यांचा लेख

डॉ. अनिश देसाई (एमडी, एफसीपी, पीजीडीएचईपी) संचालक स्ट्रॅटेजिक मेडिकल अफेअर्स आणि श्री. सुशांत रावराणे, सह-संस्थापक, संचालक, अड्रॉइट बायोमेड लिमिटेड यांचा लेख

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 7 जून: कोव्हिड-19 चे युद्ध नुकते कुठे संपते आहे आणि सारे काही पूर्ववत होत आहे असे वाटत असतानाच या जीवघेण्या महामारीच्या दुस-या लाटेने आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने जबरदस्त तडाखा दिला. (Coronavirus in India) अत्यंत भीतीदायक अशा या साथीमध्ये आपली रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याकडे कोणत्‍याही प्रकारे दुर्लक्ष न करण्‍याचा वैद्यकीय सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. दुस-या लाटेचा प्रादुर्भाव अधिक तीव्र होत असताना आपली रोगप्रतिकारशक्‍ती स्थिर ठेवण्‍यासोबत वाढवणे अत्‍यंत गरजेचे बनले आहे आणि यासंदर्भात थोडेही बेसावध राहून चालणार नाही. (how to increase immunity system) काही वैद्यकीय निरीक्षणांमध्‍ये दुप्‍पट वेगाने वाढणा-या महामारीच्‍या प्रादुर्भावादरम्‍यान प्रबळ रोगप्रतिकारशक्‍ती असण्‍याचे महत्त्व स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. तुमची रोगप्रतिकारशक्‍ती जितकी कमी असेल तितकीच विषाणूच्या वांरवार संपर्कात आल्याने गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक वाढते असे दिसून आले आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरू असली तरीही प्रत्येकाला लस मिळायला अजूनही बराच अवकाश आहे. शिवाय जगाच्या नव्या व्यवस्थेमध्ये सर्व प्रकारचे साथीचे रोग जोरावर असणार आहेत. वातावरण बदलामुळे मानव वंश मोठ्या आरोग्य समस्यांच्या गर्तेच्या तोंडाशी उभा आहे आणि या समस्यांवरील योग्य उतारा खुद्द निसर्गाकडेच उपलब्ध आहे. प्रसूतीनंतर वाढलेलं वजन प्रयत्न करूनही कमी होत नाही; वाचा या खास टिप्स तुमची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारे न्यूट्रास्यूटिकल्‍स न्यूट्रास्यूटिकल्‍सनानेहमीच सर्वाधिक सक्षम रोगप्रतिकारशक्ती वर्धके मानले गेले आहे. आपल्या शरीरातील पोषकमूल्यांची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य आहाराच्या साथीने घ्यावयाच्या ताकदीची पूरके म्हणून आपली भूमिका त्यांनी नेहमीच चोख बजावली आहे. तुम्हाला आजवर माहीत नसलेल्या ३ सर्वोत्कृष्ट न्यूट्रास्यूटिकल इम्युनिटी बूस्टर्सची यादी पुढीलप्रमाणे: ग्लुटॅथिऑन ग्लुटॅथिऑन हे जगद्विख्यात मास्टर अँटी-ऑक्सिडंट आहे व ते रोगप्रतिकारशक्ती वाढविणा-या आपल्या परिणामकारक क्षमतांसाठी ओळखले जाते. पण या घटकाबद्दल अजूनही कुणाला फारशी माहीत नसलेली गोष्ट म्हणजे याच्या दाहशामक गुणधर्मामुळे याला 'वंडर मॉलेक्युल' अशी उपाधीही मिळाली आहे. ग्लुटॅथिऑन हे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि विषाणूंनी पेशींवर केलेल्या हल्ल्यामुळे होणा-या दाहाचा प्रतिरोध करण्याच्या कामी परिणामकारक आहे. पेशीपातळीवर होणा-या हानीमुळे शरीरात संसर्गाचा फैलाव होत असतो आणि त्यासाठी कारक ठरणा-या प्रतिक्रियाशील ऑक्सिजन प्रजाती(आरओएस)चे प्रमाण कमी करण्याचे कामही ते परिणामकारकरित्या करते. आरओएसमुळे ऑक्सिडंट/अँटिऑक्सिडंट्सचा असमतोल तयार होतो. कोव्हिडमुळे होणा-या व सार्समध्ये विशेषत्वाने दिसणा-या श्वसनसंस्थेतील सर्वाधिक प्राणघातक अशा काही संसर्गांच्या गाभ्याशी हाच असमतोल असतो. ग्लुटॅथिऑनची पातळी कमी झाल्यास अनेक रोगप्रतिकारक पेशींच्या (विशेषत: लिम्पोसाइट्सच्या) कार्यात अडथळा येत असल्याचे नोंदविले गेले आहे आणि ग्लुटॅथिऑनची पातळी पूर्ववत झाल्यानंतर या पेशींचे कार्यही पुनश्च सुरळीत होत असल्याचे दिसून आले आहे. ग्लुटॅथिऑन शरीरातील रोगकारक जंतू¬ला ओळखते आणि दीर्घकालीन संरक्षणासाठी प्रतिपिंडे तयार करते. याचे शक्तीशाली गुणधर्म फुफ्फुसांमधील दाह आटोक्यात ठेवतात आणि विषाणूसंसर्गाच्या काळात फुफ्फुसांचे कार्य परिणामकारकरित्या सुरू राहण्यास मदत करतात. औषध म्हणून Steroid घेत आहात? या चुका टाळा; अचानक वाढेल वजन Vitamic C Vitamic C आपल्‍या रोगप्रतिकारशक्‍तीचा अग्रणी योद्धा मानले जाते. Vitamin C रक्ताच्या तुलनेत आपल्या रोगप्रतिकारक पेशींच्या आत १०० पट अधिक प्रमाणात एकवटलेले असते असे दिसून आले आहे. पांढ-या पेशी जेव्हा संसर्गाशी लढाई करत असतात तेव्हा तर हे जीवनसत्त्व तेथे अधिकच एकवटते. Vitamin C हे एक परिणामकारक अँटीऑक्सिडंट आहे, जे मुक्त पेशीसमूहचा उद्रेक उदासीन बनवते आणि त्यामुळे रोगप्रतिकारक पेशींच्या गतीशीलतेमध्येही सुधारणा होते. Vitamin C ला ग्लुटॅथिऑनची किंवा एन-अॅसिटील सिस्टिन (एनएसी) सारख्या ग्लुटॅथिऑन प्रीकर्सर्सची जोड दिल्याने रोगप्रतिकारशक्तीला बळ मिळते व शरीराची संसर्गाविरोधात लढण्याची क्षमता वाढते. रोगप्रतिकारशक्तीशी तडजोड हे संसर्गबाधित होण्यास निमित्त ठरणारे एक मोठे कारण आहे. वयोवृद्ध व्यक्ती, मधुमेही, ज्यांच्या रोगप्रतिकारशक्तीचे दमन झाले आहे असे रुग्ण, निकस आहार आणि चुकीच्या जीवनशैलीशी निगडित सवयी असा कारणांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते व अशा व्यक्ती संसर्गबाधित होण्याची शक्यता जास्त असते. कार्यतत्पर आणि सक्षम रोगप्रतिकारशक्ती आवर्जून जपणे हीच स्वत:ला सुरक्षित आणि सुसज्ज ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. रोगकारकांचा संपर्क पूर्णपणे टाळणे हे जवळ-जवळ अशक्य असले तरीही अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची रेलचेल असलेला समतोल आहार घेणे व निरोगी, सक्रीय जीवनशैली सांभाळणे हे मात्र आपल्या हातात आहे. त्याचबरोबर Vitamin C, Glutone १००० / Glutone C अशा न्यूट्रास्यूटीकल्सची पूरक जोड आहाराला देऊन आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर थेट सकारात्मक परिणाम घडवून आणण्याचा विचार सध्याच्या परीक्षेच्या काळामध्ये करणे योग्य ठरू शकेल.
First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus

पुढील बातम्या