मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी! देशात पहिल्यांदा COVAXIN चं ह्युमन ट्रायल; तरुणाला दिला पहिला डोस

मोठी बातमी! देशात पहिल्यांदा COVAXIN चं ह्युमन ट्रायल; तरुणाला दिला पहिला डोस

हे ट्रायल यशस्वी झाले तर कोरोनापासून बचाव शक्य होणार आहे

हे ट्रायल यशस्वी झाले तर कोरोनापासून बचाव शक्य होणार आहे

हे ट्रायल यशस्वी झाले तर कोरोनापासून बचाव शक्य होणार आहे

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 16 जुलै : देशात पहिल्यांदा कोरोना लशीचं ह्युमन ट्रायल करण्यात आलं आहे. पाटन्याच्या एम्स रुग्णालयात हे ट्रायल करण्यात आलं आहे. पाटन्यातील एम्सच्या विशेष टीमने 30 वर्षीय तरुणावर हे ट्रायल केलं आहे. त्याला हाफ एमएल डोस देण्यात आला आहे. लस दिल्यानंतर तब्बल 4 तासांपर्यंत त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आलं आहे.

सांगितले जात आहे की 14 दिवसांवतर पुन्हा त्याला सेकंड डोस देण्यात येणार आहे. देशात आतापर्यंत अशा प्रकारचे ट्रायल कोणत्याही संस्थेत झालेलं नाही. पाटना एम्सचे निर्देशक प्रभात कुमार सिंह यांनी सांगितले की आता पर्यंत 18 जणांची चाचणी करण्यात आली होती. ज्यामध्ये 8 जणांना डोस देण्यात आलं आहे. अजून काहीजण येणं बाकी आहे. त्यांनाही हा डोस दिला जाईल.

पाटना एम्समध्ये देशात पहिल्यांदा कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी ह्युमन ट्रायल केलं जात आहे. आतापर्यंत देशात अशा प्रकारचे ट्रायल कोणत्याही संस्थेत झालेलं नाही.

हे वाचा-'या' दोन कोरोना लस पोहचल्या अंतिम टप्प्यात, अशी आहे मेड इन इंडिया लशीची स्थिती

देशात सर्वात पहिलं ट्रायल केल्यानंतर पाटना एम्सच्या तज्ज्ञांनी गुरुवारी 6 आणखी लोकांवर ट्रायल केलं. सोमवार आणि मंगळवारी एकूण 18 लोकांची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी बुधवारी एकावर ट्रायल करण्यात आलं आणि गुरुवारी 6 लोकांवर याचं ट्रायल करण्यात येणार आहे. अशा प्रकारे पाटन्यात एकूण 50 जणांवर कोरोना लशीचं ट्रायल करण्यात येणार आहे.

सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकांकडून कोरोनाच्या लशीची प्रतीक्षा आहे. सध्या विविध पर्यायांचा उपयोग करीत कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे.

First published: