Home /News /coronavirus-latest-news /

‘या’ मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वासन पूर्ण, खासगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत

‘या’ मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वासन पूर्ण, खासगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे.

    पाटणा, 1 मार्च :  कोरोनाचा (Corona) प्रसार रोखण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम (Vaccination process)  सुरु झाली आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याचबरोबर 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असलेल्या लोकांचंही लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयात लसीकरण विनामूल्य आहे, तर खाजगी रुग्णालयात मात्र लसीकरणाच्या प्रत्येक डोससाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. बिहारच्या जनतेला दिलेलं मोफत कोरोना लशीचं (Free Corona Vaccine) आश्वासन पूर्ण करण्याची तयारी बिहार सरकारनं सुरु केली आहे. त्यानुसार राज्यातील खासगी रुग्णालयात देण्यात येणाऱ्या कोरोना लशीचा खर्च सरकार करणार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक मागच्या वर्षी झाली होती. त्या निवडणूक प्रचारात पुन्हा सत्तेवर आल्यास मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन सत्तारुढ आघाडीनं दिलं होतं. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. नितिश कुमारांनी घेतली लस बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनीही सोमवारी लस घेतली. पटणातील आयजीआयएमएस (IGIMS Patana) हॉस्पिटलमध्ये त्यांनी लस घेतली. यावेळी बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय तसंच प्रमुख सरकारी अधिकारी उपस्थित होते. बिहारमधील तिसऱ्या लसीकरण मोहिमेलाही आज सुरूवात झाली. मी आज व्हॅक्सिन घेतलं आहे. सर्वांनी कोरोना व्हॅक्सिन घ्यावं, असं आवाहन नितीश कुमार यांनी यावेळी केलं. बिहारमधील 700 सरकारी केंद्रावर आजपासून लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. 15 मार्चपर्यंत या केंद्रांची संख्या 1000 पर्यंत वाढवण्यात येईल. एप्रिल महिन्यात 1600 केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती राज्य आरोग्य विभागानं दिली आहे. ( वाचा : कोरोना लसीकरणासाठी 'या' लिंकच्या आधारे करा रजिस्ट्रेशन, अगदी सोपी आहे पद्धत ) मोदींनी घेतली कोरोना लस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Corona vaccine, Nitish kumar

    पुढील बातम्या