Home /News /coronavirus-latest-news /

मोठी कारवाई; क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा भांडाफोड

मोठी कारवाई; क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा भांडाफोड

यावेळी या रुग्णालयात 25 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठाही आढळून आल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे.

वाशिम, 24 मे : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाचा गैरफायदा घेत अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. निव्वळ आपल्या स्वार्थासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गोरखधंद्याविरुद्ध मोहीम उघडून त्यांच्या मुसक्या आवळण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून या करीता रुग्ण कल्याण समितीचे गठण करण्यात आले आहे. आज या मोहीमेअंतर्गत कारंजा येथील रौशन क्लिनिक या नावाने सुरु असलेल्या एस एम सिद्दीकी यांच्या बोगस दवाखान्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी येथे 2 रुग्णांवर अवैधरित्या उपचार सुरू होते. त्या व्यक्ती कडे असणारे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी या रुग्णालयात  25 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठाही आढळून आल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्यानं अनेकांना आपले जीव ही गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक बोगस डिग्री असलेला डॉक्टर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असल्याच्या तक्रारीवरून कारंजा तालुका रुग्ण कल्याण समिती, आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रित्या कारंजा शहरातील रोशन क्लिनिकवर कारवाई केली आहे. या क्लिनिकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवलेला औषधासाठा असल्यानं अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करत आहेत. कारंजा तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या अनुषंगाने बोगस डॉक्टर कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करत असल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या तक्रारी प्रशासन व तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या. हे ही वाचा-Maharashtra corona update : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा! नीचांकी रुग्णसंख्या डॉक्टरकडे डिग्रीबाबत विचारणा केली असता बोगस MCAM & BSAM यांचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ अलटरनेटिव्ह मेडिसीन दिनांक 30 डिसेंबर 2005 कोर्स BAMS(AM) नंबर AM 2638 असे कोणतेही नूतनीकरण न केलेले प्रमाणपत्र दाखविले. यानुसार रुग्णांना ऍडमिट करण्याचा ऍलोपॅथिक औषधे देण्याचा औषधाचा साठा करण्याचा अधिकार नसताना त्यांनी अधिकार कक्षे बाहेर जाऊन गैरकायदेशीरपणे कामकाज केल्याचे आढळून आले. दवाखान्यामध्ये ज्या रुग्णांचे तपासणी अहवाल आढळले त्यावरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सुद्धा येथे उपचार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. ही माहिती तहसीलदार धिरज मांजरे आणि पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांना देण्यात आली. या क्लिनीकमध्ये वरील मजल्यावर सापडलेल्या औषधामध्ये लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या UViagra व Suhagra गोळ्या, गरोदर महिलांचे ब्लिडिंग थांबवणार्या गोळ्या, झोपेच्या व गुंगी आणणाऱ्या गोळ्या, स्टिरॉइड ज्यांचा कोरोना रुग्णावर सुरुवातीस जास्त प्रमाणात वापर झाल्यास म्युकर म्युकोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona spread

पुढील बातम्या