• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Maharashtra corona update : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा! नीचांकी रुग्णसंख्या; पण 361 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Maharashtra corona update : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा! नीचांकी रुग्णसंख्या; पण 361 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

सरकारी आकडेवारीनुसार दरदिवशी सापडणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 मे : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave Maharashtra) कहर राज्यात आता कमी होऊ लागल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. राज्यात दिवसा 60 ते 65 हजारांपर्यंत गेेलेली रुग्णसंख्या आता घसरणीला लागली आहे. आज राज्यात एकूण 22122 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 361 कोरोनाबाधित (Corona Infection) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरदिवशी सापडणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. काल रविवारी 26 हजार 133 रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी राज्यात कोरोनाचे नवे 26 हजार 672 रुग्ण (Maharashtra Corona Case updates)आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील (Corona Second wave) रुग्णसंख्येचा विचार करता गेल्या दोन महिन्यांमधला हा सर्वात कमी आकडा होता. सोमवारी त्याहीपेक्षा कमी नवे रुग्ण सापडले. सोमवारी सर्वसाधारणपणे इतर दिवसांच्या मानाने नवी रुग्णसंख्या कमीच येते, असा ट्रेंड आहे. रविवारी अनेक ठिकाणी लॅब टेस्टिंग बंद असल्याचा तो परिणाम मानला जातो. पण तरीही 24 मे ची संख्या गेल्या कित्येक सोमवारपेक्षाही कमीच आहे. 42,320 कोरोना रुग्ण आज बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 51,82,592 कोरोना रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून हा दर 92.51% एवढा झाला आहे. राज्यभरात 361 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.59 टक्के आहे. सध्या 27,29,301 रुग्ण गृह अलगीकरणात असून 24,932 लोक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. हे वाचा - ICMR चा नवा धक्कादायक अहवाल: रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या 3.6 टक्के रुग्णांना Black Fungus मुंबई, पुण्यामध्ये सापडणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असून आज मुंबई शहर परिसरात 1049 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत दुसऱ्या लाटेमध्ये दररोज 10 हजारापर्यंत कोरोना रुग्ण सापडत होते. त्यामध्ये आता मोठी घट होत चालली असून हा आकडा आता हजार दोन हजारच्या आसपास आला आहे. तर पुण्यातही अशीच स्थिती असून तेथीलही रुग्णसंख्या घटत असून आज केवळ 541 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: