मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसावर होतोय विपरित परिणाम? संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसावर होतोय विपरित परिणाम? संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

दम्यानं ग्रस्त असलेल्या तरुण लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

दम्यानं ग्रस्त असलेल्या तरुण लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

दम्यानं ग्रस्त असलेल्या तरुण लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

  नवी दिल्ली 14 सप्टेंबर : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गानं माणसाच्या श्वसन संस्थेवर आघात होतो. या विषाणूची लागण झाल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होतो. यातून बरे झाल्यानंतरही लोकांना प्रचंड थकवा जाणवतो. थोडेसे श्रम केले तरी दम लागतो. पूर्ववत होण्यास अनेकांना दीर्घ कालावधी लागतो. या आजाराचा सर्वात वाईट परिणाम फुफ्फुसांवर (Lungs) होतो, असं आतापर्यंतच्या संशोधनानुसार मानलं जात होतं. परंतु अलीकडेच करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात, कोरोना संसर्गामुळे तरुण व्यक्तींमध्ये (young Generation) फुफ्फुसांचे नुकसान होण्याचा धोका खूप कमी असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.

  कोविड-19 च्या संसर्गामुळे तरुणांच्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. फुफ्फुसे पूर्वीप्रमाणे काम करतात, असा दावा नुकत्याच व्हर्च्युअल युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये (virtual European Respiratory Society International Congress) सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधात करण्यात आला आहे.

  'कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटपुढे लसही ठरणार निरुपयोगी? बराच काळ राहणार धोका'

  या संशोधनाबाबत माहिती देताना स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे (Karolinska Institute) संशोधक डॉ. इडा मोगेंसेन (Dr. Ida Mogensen) म्हणाले की, दम्यानं ग्रस्त असलेल्या तरुण लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असला तरी फुफ्फुसांच्या काम करण्याच्या क्षमतेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचं अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

  लहान मुलं (Children) आणि किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनामुळे फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं आढळून आलं आहे, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. कोरोनापूर्वी त्यांची फुफ्फुसे ज्या क्षमतेनं काम करत होती, त्याच क्षमतेनं ते कोरोनानंतरही काम करत असल्याचं आढळलं आहे. गंभीर स्थिती असलेल्या मुलांच्या फुफ्फुसांवर मात्र परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

  भारतीयांसाठी खूशखबर! COVAXIN ला या आठवड्यात WHO कडून मंजुरी मिळण्याची शक्यता

  स्टॉकहोममध्ये (Stockhome) करण्यात आलेल्या या अभ्यासात 1994 ते 1996 दरम्यान जन्म झालेल्या म्हणजे साधारण 22 वर्षे वयाच्या तरुणांचा समावेश होता. कोरोनापूर्वी म्हणजे 2016 ते 2019 दरम्यान, या लोकांच्या अन्य कारणांमुळे विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर 2020 ते मे 2021 दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसाच्या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या इओसिनोफिल्सची (eosinophils) चाचणी करण्यात आली. त्यावेळी 661 लोकांपैकी 178 लोकांमध्ये कोरोनाच्या विषाणूविरुद्ध (SARS-CoV-2) अँटीबॉडीज (Antibodies) तयार झाल्या असल्याचं आढळून आलं. कोरोनापूर्वी आणि कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर या लोकांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता पूर्वीसारखीच असल्याचंही यावेळी स्पष्ट झालं.

  कोरोनामधून बरे झाल्यानंतर आपली फुफ्फुसे निरोगी असतील की नाही याची चिंता तरुणवर्गाला सतावत होती. त्यांना या संशोधनामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

  First published:
  top videos

   Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus