आंध्रप्रदेश, 10 मे : आंध्रप्रदेशातील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानेही ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदात वर्तविण्यात येत आहे. अतिदक्षता विभागात हे कोविड रुग्ण दाखल आहेत. दरम्यान ऑक्सिजन पुरवठा थांबताच राखीव ठेवण्यात आलेले ऑक्सिजन सिलेंडर लावण्याचा प्रयत्न झाला. त्या पाच मिनिटात श्वास घेता न आल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या अकरा रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावल फिरत आहे. दरम्यान श्रीपेरम्बदुर येथून ऑक्सिजनचा टॅकर मागवण्यात आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली असून तणावाच वातावरण आहे.
भीषण! आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सीजन पुरवठा थांबल्याने अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे pic.twitter.com/yhcAGzgWV5
— News18Lokmat (@News18lokmat) May 10, 2021
हे ही वाचा- भयंकर! गंगेत वाहताना आढळले 40-45 मृतदेह; कोरोना बळींची विल्हेवाट लावल्याचा संशय ऑक्सिजन अभावी तडफडणाऱ्या रुग्णाना वाचवण्यासाठी नातेवाईकांनी केविलवाणे प्रयत्न केल्याचे चित्र पहायला मिळाले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत

)







