जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / जीव मुठीत धरुन रुग्णालयातून कोरोना लशींची चोरी; घरी आल्यावर निघाले पोलिओचे डोस

जीव मुठीत धरुन रुग्णालयातून कोरोना लशींची चोरी; घरी आल्यावर निघाले पोलिओचे डोस

जीव मुठीत धरुन रुग्णालयातून कोरोना लशींची चोरी; घरी आल्यावर निघाले पोलिओचे डोस

कोरोना लशींची मागणी इतकी वाढत आहेत, की चोरटे रुग्णालयात जाऊन लशींची चोरी करीत आहेत. येथे मात्र या चोरट्याचीच फसवणूक झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अंबरनाथ, 24 मे : राज्यात सध्या सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा आहे. मागणीच्या तुलनेत लशींचा पुरवठा कमी होत असल्याने अनेकदा लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ येते. आपल्याला लवकर कोव्हीड लस मिळावी म्हणून पहाटे चार ते पाच वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर टोकन मिळवण्यासाठी नागरिकांची भली मोठी रांग लागलेली असते. मात्र तरीदेखील अनेकदा लसीकरण केंद्रावरील लस संपल्यानंतर नागरिकांना पुन्हा घरी परतावं लागते. कोरोना आजारापासून आपला बचाव करण्यासाठी लशीला प्राप्त झालेले हे महत्व आणि लस मिळवण्यासाठी असलेली ही धडपड दिवसागणिक वाढतच आहे. याच सगळ्यातून आता रेमडिसिव्हीर इंजेक्शन नंतर कोव्हीड व्हॅक्सीनच्या चोरीच्या घटना समोर येत आहेत. अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रामीण भागात देखील असा कोव्हीड व्हॅक्सीनच्या चोरीचा प्रकार घडला आहे. मात्र चोराला पोलिओ आणि कोरोना लसींमधील फरक न समजल्याने त्याच्या डाव फसला. कोव्हीड व्हॅक्सीन समजून चोरट्यांनी पोलिओचेच डोस चोरल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये समोर आला आहे. या चोरट्यांनी 25 पोलिओचे डोस चोरून पोबारा केला आहे. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ आरोग्य केंद्रात हा चोरीचा प्रकार घडला आहे. हे ही वाचा- पुण्यात Lockdown मध्ये क्रिकेटची हौस पडली महागात; थेट 11,500 रुपयांचा दंड या आरोग्य केंद्राची खिडकी तोडून चोरट्यांनी आरोग्य केंद्रात प्रवेश करत चोरी केली. हे प्राथमिक आरोग्य केंद्र कोव्हीड प्रतिबंधक लसीकरनाचे केंद्र आहे. त्यामुळे इथे कोव्हीड लशींचे डोस असतील असा समज या चोरट्यांचा झाला असावा. मात्र कोव्होड लस आणि पोलिओची लस यातला फरक या चोरट्यांना कळला नसल्याने त्यांनी पोलिओचे डोस चोरी केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी या लशींचे डोस ठेवण्यात आले होते, तिथे ते सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहेत. मात्र चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्क्रीन देखील चोरून नेली आहे. सोमवारी सकाळी तेथील कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी यासंबंधीची माहिती वरिष्ठांना दिली, सध्या या प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात