Home /News /coronavirus-latest-news /

अजबच! RT-PCR टेस्टसाठी पर्यायी ठरेल ही रॅपिड टेस्ट, मधमाश्या लावणार कोव्हिड रुग्णाचा शोध

अजबच! RT-PCR टेस्टसाठी पर्यायी ठरेल ही रॅपिड टेस्ट, मधमाश्या लावणार कोव्हिड रुग्णाचा शोध

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘ असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘ असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

कोविड-19 टेस्टसाठी वैज्ञांनिकांनी एक अनोखा पर्याय शोधलेला आहे. वैज्ञांनिकांच्या मते मधमाश्यांचा (Honeybees) कोरोना टेस्टसाठी वापर केला जाऊ शकतो. RT-PCR टेस्ट पेक्षा हा स्वस्त पर्याय असणार आहे.

  नवी दिल्ली, ०8 मे: यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना (Corona) चे रुग्ण झपाट्याने वाढलेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दररोज 4 लाख कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळेचे कोरोना आरटीपीसीआर टेस्ट (Corona RT-PCR Test) करणाऱ्या लॅबवर दबाव वाढलेला आहे. अशात रिपोर्ट मिळण्यासाठी रुग्णांना 5 ते 7 दिवस वाट बघावी लागते. सध्या कोरोना टेस्टसाठी RT-PCR हाच एक योग्य पर्याय मानला गेला आहे. पण आता कोरोना टेस्टसाठी वैज्ञानिकांनी (Scientists) एक अनोखा पर्याय शोधून काढला आहे. हा पर्याय आहे कोरोना टेस्टसाठी मधमाश्यांचा (Bees) उपयोग. आगळीवेगळी टेस्ट वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार वैज्ञांनिकांनी हा शोध लावला आहे. ज्यानुसार मधमाश्यांना प्रशिक्षण (Training bees) देण्यात आलेलं आहे. या मधमाश्या (Bees)  कोरोना विषाणूला त्याच्या वासावरून शोधू शकतात. कोरोना पेशंटच्या समोर येताच, या विषाणूच्या वासाने मधमाश्या आपली जीभ बाहेर काढतात. त्यावरुन तो रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) असल्याचं मानलं जातं.  कोरोना संसर्ग ओळखण्यासाठी करण्यात येणारी RT-PCR टेस्टचे रिपोर्ट यायला वेळ लागतो. त्यामुळे अशा काळात ही रॅपिड टस्ट फायदेशीर आहे. या टेस्टला रॅपिड टेस्ट (Rapid Test) म्हटलं जातं. (हे वाचा- कोरोनापासून बचावासाठी भाजप आमदारानं सांगितला उपाय, गोमूत्र पितानाचा VIDEO शेअर) कसं दिलं प्रशिक्षण? वैज्ञांनिकांनी जवळपास 150 मधमाश्यांना पॉवलोवियन कंडीशनिंग पद्धतीने प्रशिक्षीत कोलं आहे. या मधमाश्यांना दरवेळी कोरोना व्हायरसच्या वासाचा सामना करण्यासाठी साखरेच पाणी देण्यात आलं. पण, व्हायरस नसणाऱ्या नमुन्यासह त्यांना काहीही दिलं गेलं नाही. त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरसचा वास आल्यावर जीभ काढण्याची सवय लागली. त्यामुळे वास असताना पण साखरेचं पाणी न मिळाल्यास त्यांना त्यांना जीभ काढण्याची सवय लागली. कमी खर्चात टेस्ट वैज्ञानिकांच्या (scientists) मते, कोरोना विषाणूची (Corona virus) ओळख पटविण्यासाठी मधमाश्यांचा वापर कमी उत्पन्न असलेल्या देशांना फायदेशीर ठरेल. ज्या देशांकडे पॉलिमरायझेशन चेन (Polymerization chain) टेस्टसाठी आवश्यक साहित्य आणि तंत्रज्ञान नाही आहे. वॅगनिनजेन यूनिव्हर्सिटी (Wageningen University) प्राध्यापक आणि संशोधनाचं नेतृत्व करणारे विम वॅनडर पोयल (Wim Wander Poyle) म्हणतात की, जगातल्या काही गरीब देशांकडे,विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, पॉलिमरायझेशन टेस्टचं साहित्य उपलब्ध नाहीये. सगळीकडेच मधमाश्या उपलब्ध असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक प्रकारे मधमाश्यांना प्रशिक्षीत करणं शक्य आहे. (हे वाचा- 15 ने नंतर तुमच्या WhatsApp चं काय होणार? या अटी स्विकारल्या नाही तर...) आज आपण पाहतो आहे. ज्याज्या देशांमध्ये कोरोनाचे हाहाकार माजवलेला आहे त्यातल्या बऱ्याच देशांमध्ये व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शिवाय या महामारीच्या काळात देशांना लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे सरकारचा खर्चही वाढत आहे. या परिस्थितीत या नविन संशोधनामुळे खर्चाचा ताण कमी होणार आहे. शिवाय जास्त काळ रिपोर्टची वाट पहावी लागणार नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Coronavirus, Research

  पुढील बातम्या