मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona चा आणखी एक भयंकर व्हेरिअंट? अलीगड मुस्लिम विद्यापीठात 20 दिवसांत 26 जणांचा मृत्यू

Corona चा आणखी एक भयंकर व्हेरिअंट? अलीगड मुस्लिम विद्यापीठात 20 दिवसांत 26 जणांचा मृत्यू

अलिगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनाच्या विनाशकारी रूपाचं थैमान सुरू असल्याची शंका आहे. गेल्या 20 दिवसांत विद्यापीठाशी संबंधित  26 जणांचा मृत्यू झाला आहे.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनाच्या विनाशकारी रूपाचं थैमान सुरू असल्याची शंका आहे. गेल्या 20 दिवसांत विद्यापीठाशी संबंधित 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनाच्या विनाशकारी रूपाचं थैमान सुरू असल्याची शंका आहे. गेल्या 20 दिवसांत विद्यापीठाशी संबंधित 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

अलीगढ, (उत्तर प्रदेश), 11 मे: अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतील (Aligarh Muslim University) कोरोना (Corona) विषाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा नवा व्हेरिएंट (New Variant) विकसित झाला असावा,अशी शंका विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापीठाने आपल्या लॅबमध्ये एकत्रित केलेले नमुने दिल्ली येथील सीएसआयआर म्हणजेच इन्स्टीट्युट ऑफ जिनॉमिक्स अॅण्ड इंटिग्रेटिव्ह बॉयोलॉजी (CSIR)येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.

कोरोना संसर्ग वाढल्यानंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठातील 16 सेवेत असलेल्या आणि 10 निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा तर 40 ते 45 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गेल्या 20 दिवसांत मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने विद्यापीठ प्रशासन चिंतेत आहे. विद्यापीठाच्या कुलगुरु तारीक मन्सूर यांनी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चला (ICMR) पत्र लिहीत विद्यापीठात संकलित केलेल्या नमुन्यांची तपासणी तातडीने करावी,अशी विनंती केली आहे.

देश पुन्हा हादरला! ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने 22 हून अधिक रुग्णांचा मृत्यू

हे सर्व नमुने AMU मधील ICMR प्रमाणित लॅबमध्ये संकलित करण्यात आले आहेत.

आयसीएमआरच्या डीजींना केली नमुने तपासणीची मागणी

कुलगुरु तारिक मन्सूर यांनी आयसीएमआर च्या डीजींना पत्र लिहीत अशी विनंती केली आहे की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर लॅबमध्ये संकलित केलेल्या नमुन्यांची जिनोम चाचणी करावी. यामधून कोरोनाचा काही नवा म्युटेंट विकसित झाला आहे का याबाबत माहिती मिळू शकेल. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार,सर्व नमुने दिल्ली येथील सीएसआयआर म्हणजेच इन्स्टीट्युट आॅफ जिनॉमिक्स अॅण्ड इंटिग्रेटिव्ह बॉयोलॉजी येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.

कोरोना संकटात Ola ची मोठी घोषणा; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले असावे,अशी शंका विद्यापीठाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. परंतु,यावर आयसीएमआरने कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या प्राध्यापकांचा झालाय मृत्यू

अलीगड मुस्लिम विद्यापीठातील टिचर्स असोसिएशनचे माजी सचिव प्रो. आफताब आलम यांनी मृत्यूमुखी पडलेल्या प्राध्यापकांची यादी तयार केली आहे. यात प्रा. शकील समदानी,माजी प्रोक्टर प्रा. जमशेद सिदिदकी,सुन्नी थियोलॉजी विभागाचे प्रा. एहसानउल्लाह फहद, उर्दु विभागाचे प्रा. मौलाना बख्क्ष अन्सारी,पोस्ट हार्वेंस्टिंग इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. मो. अली खान,राजकिय विज्ञान विभागाचे प्रा. काझी,मोहम्मद जमशेद,मोलिजात विभागाचे अध्यक्ष प्रा. मो. युनुस सिदिदकी,इलमुल अदविया विभागाचे अध्यक्ष गुफराम अहमद,मानसशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा. साजिद अली खान,म्युजिओलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान, सेंटर फॉर वुमेन्स स्टडीज विभागाचे डॉ. अजीज फैसल,पॉलिटेक्निक विद्यापीठाचे के. मोहम्मद सैयदुज्जमान, इतिहास विभागातील सहप्राध्यापक जिबरेल,संस्कृत विभागाचे माजी अध्यक्ष प्रा. खालिद बिन युसुफ आणि इंग्रजी विभागाचे डॉ. मोहम्मद युसूफ अन्सारी यांचा समावेश आहे.

10 निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू

आतापर्यंत 10 निवृत्त प्राध्यापकांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. यातील 4 प्राध्यापकांचा कानपूरमध्ये मृत्यू झाला आहे. प्रा. आफताब आलम यांनी याबाबत सांगितले की विद्यापीठासाठी हा कालावधी खूपच खराब आहे. विद्यापीठाशी संलग्न एवढ्या लोकांचा मृत्यू यापूर्वी कधीच झाला नव्हता.

First published:

Tags: Aligarh, Coronavirus, Uttar pradesh