Home /News /coronavirus-latest-news /

Aarogya Setu नं लॉन्च केलं नवं फिचर, संपूर्ण भारतात प्रवासादरम्यान मिळणार मदत

Aarogya Setu नं लॉन्च केलं नवं फिचर, संपूर्ण भारतात प्रवासादरम्यान मिळणार मदत

ज्या नागरिकांनी मोबाईलमध्ये हे ॲप (Aarogya Setu) डाउनलोड केलं आहे आणि लसीचे (Corona Vaccine) दोन डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी ब्लू शील्ड आणि ब्लू टिक दाखवणार आहे. या स्टेटसमुळे नागरिकाला देशात प्रवास करण्यासाठी मदत होईल.

नवी दिल्ली 02 जून: ॲप हा शब्द आपल्या आयुष्यात नव्हता तेव्हा त्याबद्दल कुतूहल वाटायचं. तंत्रज्ञानाशी संबंधित असलेला हा शब्द परकाही वाटायचा, पण आता हा शब्द आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स ग्रामीण भारतीयांच्याही हळूहळू अंगवळणी पडत आहेत. कोरोना महामारीदरम्यान भारत सरकारने कोविड-19 कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू हे ॲप लॉन्च केलं. या ॲपमुळे तुमच्या आजुबाजूला असलेल्या किंवा तुम्ही नुकतीच भेट दिलेल्या व्यक्तीला कोविड-19 ची बाधा झाली आहे का याची माहिती मिळते. तसंच सरकारी दवाखाने, हॉस्पिटल्सशी संबंधित सर्व माहिती या ॲपमधून मिळते. आता आरोग्य सेतू ॲपमध्ये नवं फीचर सुरू करण्यात आलं आहे. ज्या नागरिकांनी मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड केलं आहे आणि लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी ब्लू शील्ड आणि ब्लू टिक दाखवणार आहे. या स्टेटसमुळे एखाद्या नागरिकाला देशात प्रवास करावा लागला तरीही त्याला आपलं स्टेटस दाखवायला मदत होईल आणि लसीचा दुसरा डोस राहिला असेल तर सहजपणे घेता येईल. टीव्ही 9 हिंदीने या संबंधी वृत्त दिलं आहे. ज्या दिवशी ती व्यक्ती लस घेईल त्या दिवसापासून 14 दिवस झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासमोर ब्लू टिक दिसणार आहे. कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर लसीकरणाचं स्टेटस व्हेरिफाय करण्यासाठी केला जाईल. त्यानंतरच एखाद्या युजरच्या नावासमोर ब्लू शील्ड स्टेटस दिलं जाईल. ज्या युजरनी कोविड लसीचा एक डोस घेतला आहे त्यांच्या ॲपमध्ये होम स्क्रीनवर एकेरी ब्लू बॉर्डर दिसणार आहे. तसंच त्यांच्या नावासमोर सिंगल टीकही दिसेल. EXPLAINER: माणसात आढळलेला बर्ड फ्लूचा स्ट्रेन कितपत घातक? वाचा कसा होतो प्रसार जर युजरने Revised Self Assessment हा पर्याय निवडला नसेल तर त्यांना Update the Vaccination Status हा पर्यायही दिसणार आहे. या ॲपमध्ये सेल्फ असेसमेंट मिळाल्यानंतरही ज्या युजरना लसीचा एकही डोस मिळालेला नसेल त्यांना होम स्क्रीनवर partially vaccination/vaccinated (unverified) असं लिहिलेलं दिसेल. आपलं लसीकरणाचं स्टेटस कसं अपडेट करायचं? 1. हे स्टेटस तुम्ही मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने अपडेट करू शकाल. त्यामुळे तुम्ही देशभर कुठेही प्रवासात असाल तरीही सहजपणे सुविधांचा फायदा घेऊ शकाल. 2. सेल्फ असेसमेंटनुसार जर यूजरनी पहिला डोस घेतला असेल तर त्याला सिंगल ब्लू बॉर्डर दिसेल आणि स्टेटस Partially Vaccinated (Unverified) दिसेल. या प्रकरणात ॲपचा आयकॉन ग्रे शेड पण दाखवेल. 3. सेल्फ असेसमेंटमध्ये जर युजरनी दुसरा डोस घेतला तर त्याच्या नावासमोर डबल ब्लू बॉर्डर दिसेल आणि स्टेटस Vaccinated दिसेल. यातही आरोग्य सेतु ॲपचा आयकॉन ग्रे शेडमध्ये दिसेल. 4. जर युजरने पहिला डोस घेतला असेल तर स्टेटसमधील व्हॅक्सिनेशननंतरचा अनव्हेरिफाइड हा शब्द दिसणार नाही. 5. दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी युजरची पूर्ण स्क्रीन ब्लू होईल आणि स्टेट्स ‘You are Vaccinated’ असं दिसेल. 6. त्यानंतर युजर view details आणि Final certificate डाउनलोड करू शकेल. इथे त्याला कन्फर्म हा पर्यायही उपलब्ध असेल. त्यानंतर युजरचं पूर्ण प्रोफाइल अपडेट केलं जाईल आणि लसीकरणाची माहिती सेव्ह केली जाईल.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Application, Corona, Covid-19, Health, Technology, Wellness

पुढील बातम्या