Home /News /coronavirus-latest-news /

आईचा कोरोना लशीला विरोध लेकीच्या जीवावर बेतला; संक्रमणामुळे 4 वर्षीय मुलीचा झोपेतच मृत्यू

आईचा कोरोना लशीला विरोध लेकीच्या जीवावर बेतला; संक्रमणामुळे 4 वर्षीय मुलीचा झोपेतच मृत्यू

फोटो सौजन्य - डेली मेल

फोटो सौजन्य - डेली मेल

कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर काही तासांतच चिमुकलीने आपला जीव गमावला.

    वॉशिंग्टन, 15 सप्टेंबर : कोरोनाव्हायरस (Coronavirus) थैमान घालत असतानाही किती तरी लोक कोरोना लस घ्यायला घाबरत आहेत किंवा कोरोना लशीला विरोध करत आहेत. कोरोना लशीला विरोध करत लस घेण्यास नकार देणाऱ्या अशाच एका आईने आपल्या लेकीला कायमचं गमावलं आहे. कोरोना संक्रमणामुळे यूएसमध्ये 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे (4 year old girl died due to corona). टेक्सासमधील (Texas) 4 वर्षीय कॅली कुकचा (Kali cook) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (Corona infected girl died in texas). कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर काही तासांतच तिचा मृत्यू झाला आहे. झोपेतच तिचा जीव गेला आहे. कॅलीमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं नव्हती. मृत्यूनंतर तिला कोरोना असल्याचं निदान झालं आणि कोरोनामुळेच तिचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालं. महत्त्वाचं म्हणजे कॅलीला तिच्या आईमुळे कोरोना झाला होता, जी कोरोना लशीला विरोध करत होती. तिच्या या भलत्यात लढ्याची किंमत तिला मोजावी लागली. तिचा लस न घेण्याचा हट्ट तिच्या लेकीच्या जीवावर बेतला. हे वाचा - फक्त एकच डोस घ्यावा लागणार; सिंगल डोस कोरोना लशीला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल डेली मेलच्या रिपोर्टनुसार कॅलीची आई कॅरा हार्वूड (Karra Harwood ) कोरोना लशीच्या विरोधात होती. तिने कोरोना लस घेतली नाही. तिच्यामुळे तिच्या चार वर्षांची चिमुकलीही कोरोनाच्या विळख्यात सापडली. कॅराने सांगितलं, मला कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला. त्यानंतर मी लगेच एका खोलीत आयसोलेट झाले. माझ्या मुलांना कोरोना होऊ नये म्हणून मी त्यांना माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्यामुळे त्यांना कोरोना होऊ नये, असं मला वाटत होतं. हे वाचा - क्रिकेटप्रेमींनो लक्ष द्या! कोरोना लस घेतली असेल तरच पाहता येणार IPL 2021 कोरोना लशीला विरोध करणाऱ्यांपैकी एक मी होते. मी तसं केलं नसतं तर बरं झालं असतं. मला आता माझ्या निर्णयावर पश्चाताप होतो आहे, असं कॅरा म्हणाली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या