मुंबई, 28 मे: कोरोनाविरोधी लढ्यात मोठं शस्त्र ठरणारं आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संजीवनी ठरणारं असं भारतात तयार झालेलं कोरोनावरील औषध म्हणजे 2-deoxy-D-glucose (2-DG). या औषधामुळे कमीत कमी ऑक्सिजनमध्ये कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरा होतो असा दावा करण्यात आला आहे. तसेच परिणामही दिसून आले आहेत. कोरोनावरील उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी मिळालेल्या या औषधाची आता किंमतही (2-DG price) जारी करण्यात आली आहे.
डीआरडीओची इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्रितरित्या हे औषध तयार केलं आहे. हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीच या औषधाचं उत्पादन घेत आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) 2-deoxy-D-glucose (2-DG) 8 मे रोजी या औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली होती.
हे वाचा - उपचार आणि बचावही; कोरोनाविरोधात 99 टक्के प्रभावी असं टू इन वन Nasal spray
या औषधाची किंमत प्रति पाऊच 990 रुपये आहे. सरकारी रुग्णालयात, राज्य आणि केंद्र सरकारला हे औषध सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. हे औषध पावडर स्वरूपात आहे. पाण्यात मिक्स करून दिलं जातं. औषध संक्रमित पेशींमध्ये जमा होतं आणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी निर्माण करून व्हायरसला वाढण्यापासून रोखतं. मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी हे औषध आहे.
ज्या रुग्णांवर या औषधाचं ट्रायल घेण्यात आलं, ते रुग्ण इतर कोरोना रुग्णांच्या तुलनेत लवकर बरे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच रुग्णांना ऑक्सिजनची गरजही कमी पडू लागली, असं सांगण्यात आलं आहे.
हे वाचा - भय इथले संपत नाही! फक्त कोरोनाच नव्हे तर आणखी 5 आजारांचं थैमान, परिस्थिती गंभीर
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या एका खासही रुग्णालयात एका 70 वर्षीय महिलेला हे औषध देण्यात आलं. या वृद्ध महिलेवर उपचार करणार्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, रुग्णाला जवळपास एक तासापूर्वी डीआरडीओचं औषध दिलं गेलं. औषध देण्यापूर्वी रुग्णाला 14 लीटर ऑक्सिजन देण्यात येत होतं. त्यावेळी त्यांची ऑक्सिजन लेवल 92 होती. एक तासानंतर औषधाचा प्रभाव दिसणं सुरू झालं. एक तास आणि 10 मिनिटांनंतर ऑक्सिजन पातळी वाढून 94 टक्के झाला. त्याच वेळी ऑक्सिजनही प्रति मिनिट 10 लिटरपर्यंत कमी झाल्याचं दिसून आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus