मुंबई, 18 डिसेंबर: 2020 सालापासून भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या केसेसमुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. सन 2021 मध्येही अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या (Jobs in India). मात्र याच दरम्यान रोजगार क्षेत्रातही नवीन रोजगाराच्या संधी दिसून येत आहेत. वास्तविक, कोविड 19 मुळे लोक घरून काम करू (Work from Home) लागले. त्यामुळे कार्यसंस्कृतीतही खूप बदल होताना दिसत आहेत. त्यातच कोरोनाकाळात काही क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी (Latest Jobs in India) वाढल्या आहेत. काही क्षेत्रांकडे तरुणांचा कल वाढला आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या क्षेत्रांना 2021 मध्ये मिळाली उभारी. कोरोना विषाणू संसर्गाचा लोकांच्या जीवनशैलीवर (Lifestyle), शिक्षणावर (Education) आणि करिअरवर (Career Tips) मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी कोणाची नोकरी गेली, तर कोणाची पदोन्नती किंवा पगारवाढ चुकली. मात्र काही नोकऱ्यांची क्षेत्रे देखील आहेत ज्यात नोकऱ्या उघडल्या गेल्या आहेत (Jobs in India). वास्तविक, लोकांच्या कामाच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे, नवीन क्षेत्रात नोकऱ्या मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत (Year Ender 2021). त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सायबर सिक्युरिटी कोर्स (Cyber Security Course) गेल्या काही वर्षांपासून सायबर सिक्युरिटी जॉब्सचा ट्रेंड टॉपवर आहे. त्यात सातत्याने प्रगती होत आहे. आयटी कंपन्यांपासून ते कॉर्पोरेट कंपन्या, कायदा संस्था, सार्वजनिक-खाजगी बँका, दूरसंचार कंपन्या आणि शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षा तज्ञांना मोठी मागणी आहे. त्यामुळे तुम्हालाही यात करिअर करायचं असेल तर हा कोर्स तुम्हाला जॉब देऊ शकतो. Career Tips: ऑफिसमध्ये होईल तुमच्याच नावाची चर्चा, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स Jobs (Artificial Intelligence Jobs) 2021 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नोकऱ्यांना मोठी मागणी होती. तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा या क्षेत्रावर फारसा परिणाम झालेला नाही. खरं तर, मॅन्युफॅक्चरिंगपासून ते सॉफ्टवेअर कंपन्या, ई-कॉमर्स कंपन्या, मोबाइल कंपन्या आणि वैद्यकीय निदान इत्यादी क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ञांना खूप मागणी आहे. हा कोर्स करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात पदवी असणे आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing jobs) कोरोना युगाने मार्केटिंगची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. आता सर्व कंपन्या डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing Jobs) वर लक्ष केंद्रित करत आहेत. या वर्षीही सोशल मीडिया मॅनेजर आणि ऑनलाइन कंटेंट क्रिएटर्ससारख्या व्यावसायिकांना खूप मागणी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







