Home /News /career /

Career Tips: ऑफिसमध्ये होईल तुमच्याच नावाची चर्चा, फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Career Tips: ऑफिसमध्ये होईल तुमच्याच नावाची चर्चा, फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा

स्वत:च्या ऑफिस बिहेविअरमध्ये बदल करून आपल्याला आजूबाजूचं एकूण वातावरण बदलता येतं. नोकरी करणं म्हणजे फक्त कामच करावं असा अर्थ होत नाही. ऑफिसमध्ये काम करत असताना तुम्हाला भविष्यासाठी काही ठोस कनेक्शनदेखील बनवावी लागतात.

मुंबई, 18 डिसेंबर : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:कडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांबद्दल विचार करणं किंवा त्यांना वेळ देणे, ही अतिशय कठीण गोष्ट ठरत आहे. नोकरदार वर्गाचा तर दिवसातील सर्वात जास्त वेळ ऑफिसमध्येच जातो. ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या सानिध्यात त्यांचा जास्त वेळ जातो. त्यामुळं ऑफिसमध्ये काही चांगले मित्र (Office Friends) बनवता आले तर आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. मात्र, मैत्री करणं हे आपल्या स्वत:च्या वागणुकीवर अवलंबून असतं. ऑफिसमधील तुमचे मित्र तुमच्याबद्दल चांगलंच बोलत असतील. पण, सर्वच सहकाऱ्यांनी तुमच्याबद्दल चांगलं बोलावं, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला स्वत:च्या वर्तणुकीवरदेखील (Office Behavior) लक्ष द्यावं लागेल. स्वत:च्या ऑफिस बिहेविअरमध्ये बदल करून आपल्याला आजूबाजूचं एकूण वातावरण बदलता येतं. नोकरी करणं म्हणजे फक्त कामच करावं असा अर्थ होत नाही. ऑफिसमध्ये काम करत असताना तुम्हाला भविष्यासाठी काही ठोस कनेक्शनदेखील बनवावी लागतात. जी दीर्घकाळासाठी तुम्हाला फायद्याची ठरतील. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगले संबंध (Bonding with colleagues) प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला स्वतःकडे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही ऑफिस टिप्सबद्दल माहिती देणार आहोत. आपलं करिअर ग्रो (Career Growth) करण्यासाठी या टिप्स तुम्हाला उपयुक्त ठरतील. हसतमुख राहा ऑफिसला पोहचल्यानंतर चेहऱ्यावर स्मितहास्य (Smile) ठेवून सर्वांना भेटा. हसतमुखानं सर्वांना भेटणं याचा अर्थ असा नाही की, तुमचं हसू खोटं आहे. ऑफिसमधील स्मितहास्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही घरातील तणाव सोडून ऑफिसमध्ये आला आहात. त्यामुळे ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर सर्वांशी चांगल्या आणि पॉझिटिव्हली बोला. ..तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी? दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या ऑफिसमध्‍ये कायम स्वत:बद्दल बोलत बसू नका. काहींना स्वकौतुक (Self-admiration) करण्याची सवय असते. ही गोष्ट तुमच्या ऑफिस इमेजसाठी (Office Image) घातक ठरू शकते. आपण ऑफिसमध्ये असताना इतरांमध्ये मिक्स होऊन वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या मीटिंगचा किंवा ग्रूपचा भाग असाल तेव्हा संयमानं इतरांचं म्हणणं ऐकून घ्या. यामुळे लोकांच्या मनात तुमची चांगली प्रतिमा तयार होईल. सहकाऱ्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करा ऑफिसमधील सहकाऱ्यांपैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीमधून आलेला असतो. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जास्त काही नाही केलं तरी त्यांची नावं आणि त्यांचे वाढदिवस नक्की लक्षात ठेवले पाहिजेत. प्रत्येक सहकाऱ्याच्या पर्सनल गोष्टींमध्ये (Personal Matters) ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. कधी-कधी फक्त तोंडओळख ठेवणं देखील ऑफिसमधील वातावरण चांगलं राहण्यास मदत करतं. MPSC परीक्षेत चालू घडामोडींची तयारी कशी करावी? योग्यवेळी स्तुती करावी जर समोरच्या व्यक्तीनं तुमची स्तुती करावी असं वाटत असेल तर तुम्हीदेखील योग्य वेळी त्यांची स्तुती केली पाहिजे. जर तुमच्या एखाद्या सहकाऱ्यानं एखादं चांगल काम केलं असेल किंवा एखादी अचिव्हमेंट केली असेल तर त्याचं मनमोकळेपणानी कौतुक करा. वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची ऑफिस इमेज नक्की चांगली व्हायला मदत होईल. त्यामुळे तुमची करिअर ग्रोथदेखील चांगली होण्यास मदत होईल.
First published:

Tags: Career, Job

पुढील बातम्या