जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तरुणांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब; पुढच्या 5 वर्षांत कोट्यवधी नोकऱ्या जाणार; रिसर्चमधून मोठा खुलासा

तरुणांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब; पुढच्या 5 वर्षांत कोट्यवधी नोकऱ्या जाणार; रिसर्चमधून मोठा खुलासा

 रिसर्चमधून मोठा खुलासा

रिसर्चमधून मोठा खुलासा

तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशन हे दोन्ही रोजगार निर्मिती आणि रोजगार विनाशाला कारणभूत घटक आहेत, असं रिसर्चच्या सारांशात म्हटलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 मे:  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं (डब्ल्यूईएफ) जिनिव्हा येथे सोमवारी (1 मे) जागतिक कामगारदिनी एक रिसर्च प्रकाशित केला आहे. या रिसर्चनुसार, एआय, डिजिटायझेशन, हरित ऊर्जा आणि चेन री-शोरिंगसह इतर आर्थिक घडामोडींचा परिणाम म्हणून सर्व व्यवसायांपैकी एक चतुर्थांश व्यवसाय पुढील पाच वर्षांत बदलतील. हे सर्वेक्षण 11 दशलक्षांहून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या सुमारे 800 कंपन्यांच्या इनपुटवर आधारित आहे. त्यासाठी 673 दशलक्ष नोकऱ्यांचा डेटासेट वापरला गेला आहे. तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशन हे दोन्ही रोजगार निर्मिती आणि रोजगार विनाशाला कारणभूत घटक आहेत, असं रिसर्चच्या सारांशात म्हटलं आहे. ‘फर्स्ट पोस्ट’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डब्ल्यूईएफ रिपोर्टनुसार, 2027 पर्यंत 83 दशलक्ष नोकर्‍या नष्ट होतील आणि 69 दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील. परिणामी, 14 दशलक्ष नोकर्‍या किंवा एकूण कर्मचार्‍यांच्या दोन टक्के निव्वळ तोटा होईल. बँक टेलर आणि कॅशियरची काम स्वयंचलित केली जाऊ शकतात त्यामुळे सेक्रेटेरियल आणि क्लेरिकल नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल. तर, एआय मशीन लर्निंग तज्ज्ञ आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मागणी लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे, असं रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पुरवठा साखळींचे स्थानिकीकरण आणि ग्रीनर इकॉनॉमीकडे वाटचाल हे भविष्यातील रोजगार विकासाचे मुख्य घटक असतील.

News18लोकमत
News18लोकमत

डिजिटल अॅक्सेसमधील वाढ आणि तंत्रज्ञानाचा सतत अवलंब केल्यानं निव्वळ नोकऱ्यांमध्ये वाढ होईल. पण, त्या तुलनेत अनेक नोकऱ्या जातीलदेखील. तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, संथ आर्थिक वाढ, पुरवठा टंचाई आणि चलनवाढ यामुळे नोकऱ्यांना सर्वांत मोठा धोका आहे. या अंदाजानुसार, सुस्पष्ट वाढ मंदावण्यासारखे मॅक्रोइकॉनॉमिक बदल नोकरीच्या वाढीस अडथळा आणतील आणि परिणामी नियोक्त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकासाचा वेग कमी होईल. कामगारांच्या बाजारातील कठीण परिस्थिती आणि नोकऱ्यांची सावकाश होणारी वाढ लक्षात घेता एम्प्लॉयर्सना कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. येणारा काही काळ कामगारांची आणि उपलब्ध नोकऱ्यांची कमतरता जाणवत राहील असं या संशोधनात मांडण्यात आलंय. MMRDA Recruitment: सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; MMRDA मुंबईमध्ये ‘या’ जागांसाठी भरती तंत्रज्ञानाचं युग जगामध्ये आतापर्यंत अनेक क्रांती घडल्या आहेत. काहींच्या माध्यमातून नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तर काहींच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही झाली आहे. चॅटजीपीटीसारख्या वेबसाइट्सना जन्म देणाऱ्या एआयला लोकप्रियता मिळत असल्यामुळे काही मानवी व्यवसाय संपुष्टात येतील. ही क्रांती गटेनबर्ग प्रेसपासून गुगलपर्यंत इतर प्रत्येकाशी तुलना करता येण्यासारखी आहे. गोल्डमन सॅक्सच्या म्हणण्यानुसार, एआयची नवीन पिढी जागतिक स्तरावर 300 दशलक्ष पूर्णवेळ नोकर्‍या स्वयंचलित करू शकते. डब्ल्यूईएफ विश्लेषणाचा दावा आहे की, डिजिटल क्रांतीचा डिजिटल कॉमर्स क्षेत्रातील रोजगार वाढीवर सर्वात मोठा सकारात्मक प्रभाव पडेल. डिजिटल कॉमर्स उद्योगात जवळपास दोन दशलक्ष नवीन डिजिटल रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. कोणी 84व्या वर्षी तर कोणी 96 व्या वर्षी घेतली पदवी; शिक्षणासाठीची जिद्द बघून तरुणांनाही वाटेल लाज सस्टेनॅबिलिटी स्पेशॅलिस्ट आणि पर्यावरण संरक्षण व्यावसायिक यांसारखे अधिक सामान्य टिकाऊ व्यवसाय, अनुक्रमे 33 टक्के आणि 34 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यातून सुमारे 10 लाख नोकऱ्या मिळतील. या दोन्ही क्षेत्रातील उच्च गुंतवणुकीमुळे या नोकऱ्या निर्माण होतील. या रिसर्च रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक नवीन नोकऱ्यांची भर पडेल. शिक्षण क्षेत्रातील रोजगार 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे विद्यापीठ आणि उच्च शिक्षणातील प्राध्यापक तसेच व्यावसायिक शिक्षणाच्या शिक्षकांसाठी आणखी 30 लाख पदे निर्माण होतील. जागतिक स्तरावर कृषी व्यावसायिकांसाठी, विशेषत: मशीन ऑपरेटर, ग्रेडर आणि सॉर्टर्ससाठी अतिरिक्त चार दशलक्ष नोकऱ्या असतील. परिणामी कृषी क्षेत्रातील रोजगारात 15 टक्के ते 30 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! ‘ही’ मोठी IT कंपनी येत्या वर्षी 15,000 जणांना देणार नोकरी नोकरी गमावण्याच्या बाबतीत अपस्किलिंग आणि रीस्किलिंग हे दोन मार्ग आहेत. डब्ल्यूईएफ रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, री-स्किलिंग क्रांतीची तातडीनं गरज आहे. कारण 44 टक्के कामगारांना नोकऱ्या टिकवून ठेवण्यासाठी त्यांची कौशल्ये अद्ययावत करणं आवश्यक आहे. CNBC-TV18 नं डब्ल्यूईएफच्या व्यवस्थापकीय संचालक सादिया जाहिदी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटलं आहे की, लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी पुढे एक स्पष्ट मार्ग आहे, ही एक चांगली बातमी आहे. सरकार आणि व्यवसायांनी शिक्षण, री-स्किलिंग आणि सामाजिक समर्थन संरचनांद्वारे भविष्यातील नोकऱ्यांकडे वळण्यास मदत करण्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे. जेणेकरून व्यक्ती या भविष्यातील कामाच्या केंद्रस्थानी असल्याची खात्री करता येईल. डब्ल्यूईएफनं अंदाज वर्तवला आहे की 2025 पर्यंत, लोक आणि मशीन या दोन्ही माध्यमांद्वारे सध्याच्या कामांवर खर्च करण्यात येणारा वेळ सारखाच असेल. हे भाकीत 2020 च्या ‘फ्युचर ऑफ जॉब्स’च्या रिपोर्टमध्ये करण्यात आले आहे. त्यात असं म्हटलं आहे की, सर्वेक्षण केलेल्या 43 टक्के व्यवसायांनी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याची योजना आखली आहे. IT क्षेत्र म्हणजे लाखोंचं पॅकेज आणि पैसाच पैसा; पण जॉबसाठी IMP असतात ‘हे’ Skills; तुमच्यात आहेत ना? भारत एक ‘ब्राईट स्पॉट’ सामाजिक कल्याण आणि सामाजिक गतिशीलतेसाठी आवश्यक असलेल्या काळजी घेणं, शिकवणं आणि आरोग्य सेवा यांसारख्या सामाजिक व्यवसायांमध्ये गैर-सामाजिक नोकऱ्यांपेक्षा हळूहळू अधिक वाढ होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. कोरोना महामारीनंतर भारत आणि ब्राझीलसह एकूण सात देशांमध्ये सामाजिक व्यवसायांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतातील एम्प्लॉयर्सला, 22 टक्के नोकरीतील बदलांची अपेक्षा आहे. जे जागतिक स्तरावर हे प्रमाण 23 टक्के आहे. भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राला नोकऱ्या निर्माण करण्याच्या किंवा टिकवून ठेवण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास आहे. डब्ल्यूईएफच्या विश्लेषणानुसार, नवीन तंत्रज्ञानाचा अधिक स्वीकार (59 टक्के), डिजिटल सेवांमधील वाढता अॅक्सेस (55 टक्के), आणि ईएसजी नॉर्म्सचं विस्तारित अॅप्लिकेशन या सर्व घटकांमुळे रोजगार निर्मिती वाढण्यास हातभार लागेल. डेटा विश्लेषक आणि शास्त्रज्ञांसोबत, एआय आणि मशीन लर्निंग विशेषज्ञ देखील भारताच्या औद्योगिक परिवर्तनात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतील. याव्यतिरिक्त, रि-स्किलिंगमध्ये एआय आणि विश्लेषणात्मक विचार हे दोन फोकस एरिया असतील. Career Tips: फक्त वर्तमानच नाही तर फ्रेशर्ससाठी Future आहेत ‘हे’ कोर्सेस; कराल तर व्हाल मालामाल डब्ल्यूईएफनं अभ्यास केलेल्या संस्थाच्या म्हणण्यानुसार, 2027 मधील टॅलेंट फॉरकास्टनुसार 39 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, पुढील पाच वर्षांमध्ये टॅलेंटची स्थिती बिघडेल. तर, 34 टक्के लोकांचा विश्वास आहे की त्यात सुधारणा होईल. संभाव्य एम्प्लॉयर्सनी स्पष्ट केलं की, कामगारांची कमतरता आणि कौशल्यांमधील अंतर हे बदलांमधील प्रमुख अडथळे आहेत. सध्या केवळ अर्ध्या कामगारांना पुरेशा प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. पण, 2027 पर्यंत दहापैकी सहा कामगारांना प्रशिक्षणाची आवश्यकता असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात