जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IT क्षेत्र म्हणजे लाखोंचं पॅकेज आणि पैसाच पैसा; पण जॉबसाठी IMP असतात 'हे' Skills; तुमच्यात आहेत ना?

IT क्षेत्र म्हणजे लाखोंचं पॅकेज आणि पैसाच पैसा; पण जॉबसाठी IMP असतात 'हे' Skills; तुमच्यात आहेत ना?

तुमच्यात  'हे' Skills आहेत ना?

तुमच्यात 'हे' Skills आहेत ना?

आज आम्ही तुम्हाला IT क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 मे: आजच्या टेनॉलॉजीच्या युगात सर्वात जास्त स्कोप कोणत्या क्षेत्राला आहे असं तुम्हला कोणी विचारलं तर तुमच्याही तोंडावर IT क्षेत्राचंच नाव असेल. कोरोना महामारीत जेव्हा अनेक कंपन्या बंद पडत होत्या हजारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात होत्या. त्याकाळातही IT क्षेत्र जोमात होतं. याचं कारण म्हणजे या क्षेत्रातील तरुण कर्मचारी आणि कुठेही काम करण्याची मुभा. म्हणूनच कोरोनाकाळानंतरही IT क्षेत्रात हजारो कर्मचाऱ्यांची भरती होऊ घातली आहे. भारतातील आणि भारताबाहेरच्या IT कंपन्या भारतात पदभरती करत आहेत. पण या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर? आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला IT क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.

News18लोकमत
News18लोकमत

लिडरशिप स्किल्स लिडरशिप म्हणजे केवळ टीम लीड करणं असं नाही. कोरोनाच्या काळात बहुतांश लोक घरून काम करत आहेत. लोकांना अक्षरशः जोडून त्यांच्याशी जुळवून घेणं, व्यवसाय यशस्वी करणं आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीनं पुढे जाणं हा देखील नेतृत्वाचा एक भाग आहे. नवीन गोष्टी शिकण्याची उर्मी आणि टीमला मोटिव्हेट करण्याची क्षमता असणं देखील महत्त्वाचं आहे. कोणी 84व्या वर्षी तर कोणी 96 व्या वर्षी घेतली पदवी; शिक्षणासाठीची जिद्द बघून तरुणांनाही वाटेल लाज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स IMP कोणत्याही वाईट परिस्थितीवर मात कशी करायची हे समजून घेणं याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल म्हणतात. हे एक स्किल आहे जे प्रत्येक क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये शोधतात. कर्मचाऱ्याची ही गुणवत्ता त्याचं विश्लेषणात्मक कौशल्य देखील दर्शवते. प्रत्येक परिस्थितीत, शांत मनानं आपल्या टीमशी जुळवून घेणं आणि समस्येवर तोडगा काढणं हे एका चांगल्या व्यक्तीचं वैशिष्ट्य मानलं जातं. म्हणूनच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स तुमच्यात असतील तर तुम्ही IT क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! ‘ही’ मोठी IT कंपनी येत्या वर्षी 15,000 जणांना देणार नोकरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट आवश्यक आयटी क्षेत्रात प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स असणं अत्यंत आवश्यक आहे. हे उमेदवाराला प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यास मदत करण्यात, टीम वर्किंग, वेळेवर पूर्ण करण्यात आणि समस्या सोडवण्यात मदत करते. हे स्किल्स जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही नेहमीच इतर कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळे असता आणि दिसता. तसंच तुमच्यातील क्षमता बघून तुम्हाला प्रमोशन पण मिळू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात