मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Wipro Recruitment: ही संधी अजिबात सोडू नका; फ्रेशर्ससाठी विप्रो कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; करा अप्लाय

Wipro Recruitment: ही संधी अजिबात सोडू नका; फ्रेशर्ससाठी विप्रो कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; करा अप्लाय

Wipro कंपनीत Freshers उमेदवारांसाठी भरती

Wipro कंपनीत Freshers उमेदवारांसाठी भरती

सध्या कंपनीनं फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या भरतीसंदर्भातील डिटेल्स

मुंबई, 19 डिसेंबर: भारतातील नामांकित IT कंपनी Wipro मध्ये (Jobs in Wipro) फ्रेसशर्ससाठी नोकरीची (Freshers jobs in Wipro) मोठी सुवर्णसंधी आहे. विप्रो फ्रेशर्स (Jobs for Freshers in IT) इंजिनिअर्सना प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer Jobs in IT) म्हणून लवकरच जॉब देणार आहे. विप्रो कंपनी ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT jobs latest) या क्षेत्रात तसंच कन्सल्टिंग क्षेत्रातही अग्रेसर आहे. विप्रोचं मुख्यालय बंगलोर, कर्नाटक इथे आहे. सध्या कंपनीनं फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या भरतीसंदर्भातील डिटेल्स.

या पदांसाठी होणार भरती   

प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)

शैक्षणिक पात्रता

B.E./B. टेक (अनिवार्य पदवी)

M.E./M. टेक (5 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम)

भारताच्या केंद्र/राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त पूर्ण-वेळ अभ्यासक्रम; पदवी, 10वी किंवा 12वी मध्ये अर्धवेळ किंवा पत्रव्यवहार किंवा दूरस्थ शिक्षण नाही- फॅशन तंत्रज्ञान, वस्त्र अभियांत्रिकी, कृषी आणि अन्न तंत्रज्ञान वगळता सर्व शाखा

उत्तीर्ण होण्याचे वर्ष: 2020, 2021, 2022 असणं आवश्यक आहे.

ऑफर स्टेजपर्यंत एक अनुशेष अनुमत आहे - 60% किंवा 6.0 CGPA किंवा तुमच्या विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समतुल्य

10वी इयत्ता: 60% किंवा त्याहून अधिक गुण असणं आवश्यक आहे.

12वी इयत्ता: 60% किंवा त्याहून अधिक गुण असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer) - 3,50,000/- रुपये प्रतिवर्ष

Year Ender 2021: कोरोनाकाळात 'या' क्षेत्रांमध्ये वाढल्या Jobs च्या संधी

काही महत्त्वाच्या सूचना

विप्रोने गेल्या सहा महिन्यांत घेतलेल्या कोणत्याही निवड प्रक्रियेत सहभागी झालेले उमेदवार पात्र नाहीत

इतर कोणत्याही देशाचा पासपोर्ट असल्यास तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे किंवा तुमच्याकडे PIO किंवा OCI कार्ड असावे.

भूतान आणि नेपाळच्या नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे

दिलेल्या ऑनलाइन मूल्यांकनापासून 90 दिवस किंवा 3 महिन्यांनंतरच उमेदवार पुन्हा नोंदणीसाठी पात्र आहेत.

उमेदवारांना एक बॅकलॉग असणं मान्य करण्यात येणार आहे.

दहावी ते पडीपर्यंत कमाल तीन वर्षांची गॅप असणं मान्य करण्यात येणार आहे.

मूल्यांकनासाठी पात्र उमेदवारांना बॅचमध्ये आमंत्रित केले जाईल.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities