मुंबई, 05 जुलै: राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि पुढच्या वर्गातल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु 'सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ने
(CBSE Term 2 result 2022) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित होतं. त्यानुसार आता CBSE चा दहावीचा निकाल
(CBSE Result 2022) हा उद्या म्हणजेच 04 जुलैला जाहीर होणार असं सांगण्यात येत होतं. मात्र आजही अजून CBSE चा निकाल जांघिर झाला नाही. निकाल लागण्यास इतका उशीर का होतो आहे असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडू लागले आहेत. या निकालाला नक्की उशीर का लागतोय? याचा संभाव्य उत्तर मिळालं आहे.
सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत बसलेले सुमारे 35 लाख विद्यार्थी त्यांच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. CBSE बोर्ड टर्म 2 ची परीक्षा संपून बराच काळ लोटला आहे आणि ज्या पद्धतीने मूल्यांकन प्रक्रिया वेगवान करण्यात आली होती त्यानुसार निकाल जाहीर व्हायला हवे होते. मात्र या निकालाला उशीर झाला आहे.
कोणतीही परीक्षा न देता थेट 2 लाख रुपये पगाराची नोकरी; पॉवरग्रीडमध्ये भरती जाहीर
CBSE बोर्ड निकाल 2022 संदर्भात मीडिया रिपोर्ट्समध्ये अनेक प्रकारचे अटकळ बांधले जात आहेत. जिथे आधी बोर्डाचा निकाल 4 जुलैला जाहीर होणार असल्याची चर्चा होती, तिथे आता जुलैच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. CBSE बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल (CBSE बोर्ड 10वी 12वी निकाल 2022) cbseresults.nic.in वर तपासता येतील.
अनेक केंद्रांवरून उत्तराची प्रत नाही?
CBSE बोर्ड हे केंद्रीय स्तरावरील बोर्ड आहे. यामध्ये देशातील विविध राज्यांव्यतिरिक्त परदेशातील शहरातील विद्यार्थीही सहभागी होतात. CBSE बोर्ड 10वी आणि 12वी चे मूल्यांकनाचे काम संपले आहे पण तरीही निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे (CBSE बोर्ड निकाल 2022). वास्तविक, बोर्डाला आतापर्यंत अनेक केंद्रांवरून तपासलेल्या उत्तराच्या प्रती मिळू शकलेल्या नाहीत.
10-12 वीत नापास झालात? हरकत नाही, DBRT कोर्स पूर्ण करा; लाखोंचे उत्पन्न कमवा
पुरात अडकल्या उत्तरपत्रिका?
CBSE बोर्ड परीक्षा 2022 मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पूरग्रस्त भागात अडकल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांना एअरलिफ्ट करण्याची बाब समोर येत आहे. सीबीएसई बोर्डाने अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही परंतु असे मानले जाते की बोर्ड लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.