Home /News /maharashtra /

Pune : दहावी-बारावी नापास झालात, टेन्शन घेऊ नका! DBRT कोर्स पूर्ण केलात की, हुशार मुलांच्या उत्पनापैक्षाही तिपटीने कमवणार

Pune : दहावी-बारावी नापास झालात, टेन्शन घेऊ नका! DBRT कोर्स पूर्ण केलात की, हुशार मुलांच्या उत्पनापैक्षाही तिपटीने कमवणार

विज्ञान आश्रम, पुणे

विज्ञान आश्रम, पुणे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच लागला. त्यात काही विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडले, तर काही जण नापास झाले. अशा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पुण्यातील विज्ञान आश्रमातर्फे DBRT हा महत्त्वाचा कोर्स सुरू केला आहे.

पुढे वाचा ...
  पुणे, 4 जून : दहावी-बाराचीचा निकाल लागला. काही जणांना खूप कमी मार्क्स मिळाले, तर काही जण नापास झाले. पण, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असे भरपूर कोर्सेस आहे, जे केल्याने आपल्या हाताला काम मिळतंच, त्याचबरोबत तुम्ही इतरांनाही काम देऊ शकता. चला तर कोणते कोर्स आहेत आणि त्या कोर्सेसना कसा प्रवेश घ्यायचा ते सविस्तर पाहुया... शिक्षण घेत असताना त्याला विद्यार्थ्याचे व्यावसायिक कौशल्य विकसित करावे, ही संकल्पना घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उद्योगधंद्यांचं ज्ञान प्राप्त व्हावं, यासाठी विज्ञानाश्रमतर्फे विविध उद्योगधंद्यांचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. पुण्यातील पाबळ येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगच्या मान्यतेने 'डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नाॅलाॅजी' या अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती विज्ञानाश्रमाचे संचालक डाॅ. योगेश कुलकर्णी यांनी दिली. पास आणि नापास विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश मुलभूत ग्रामीण पदविका (DBRT) कोर्स अभ्यासक्रम प्रवेश सुरू झालेले आहेत. प्रत्यक्ष काम करत अनुभवातून शिकता येतं आणि यशस्वी उद्योजक बनता येतं. हा 1 वर्षाचा आहे. या कोर्समध्ये वर्कशॉप, इलेक्ट्रिकल, फूड प्रोसेसिंग, डेअरी, पोल्ट्री, सौर तंत्रज्ञान, आधुनिक शेती, संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग यामधील कौशल्य आधारित शिक्षण दिलं जाणार आहे. DBRTचा कोर्स पूर्ण केल्यानंतर भविष्यात हाताला काम आणि उत्पन्नाची जबरदस्त संधी मिळणार आहे. कोर्सचं वैशिष्ट्य काय? विज्ञानाश्रमाचे संस्थापक ज्येष्ठ शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यात कालानुरूप अनेक बदल करण्यात आले आहेत. शेतीआधारित ग्रामीण विकासाला गती देणारा हा अभ्यासक्रम आहे. हा कोर्स 1 वर्षाचा आहे. त्यामध्ये आधुनिक पद्धतीने उद्योग प्रशिक्षणावर भर देण्यात येते. इतकंच नाही, तर कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांना व्यवसाय उभं करण्यासाठी आर्थिक मदतही केली जाणार आहे. विशेष हे की, दहावी-बारावीत कमी मार्क्स मिळालेल्या किंवा नापास झालेल्या मुलांनाही इथं प्रवेश घेता येतो. वाचा : Career Alerts : सुरुवातीलाच 6 लाखांचं पॅकेज मिळतं; मुंबई विद्यापीठात 4 पैकी कुठलाही 1 कोर्स करा ग्रामीण भागात शेती आणि कृषी आधारित उद्योगांच्या उभारणीसाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. हाताने काम करण्याच्या सूत्रावर हा अभ्यासक्रम आधारित आहे. या पदविका प्रमाणपत्रानंतर विद्यार्थ्याना बँकेकडून व्यवसाय उभारणीसाठी कर्ज मिळवण्यासाठी विज्ञानश्रमाकडून मदत केली जाते. कोर्सची फी किती?  या कोर्सची वार्षिक फी 21 हजार रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल आणि मेसची सोय हवी आहे त्यांना 46 हजार रुपयांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध होतील. यासोबतच मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोयदेखील आहे. तसेच विद्यार्थ्यांना कोर्स चालू असताना इंटर्नशिप करावे लागते, यामध्ये त्यांना 8000 रुपये पर्यंत उत्पन्न मिळते. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्याला हवे तसे उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात.

  गुगल मॅपवरून साभार...

  अधिक माहितीसाठी संपर्क कसा कराल?  या कोर्सची थेट माहिती जाणून घेण्यासाठी 9730005025 किंवा 9730005029 या क्रमांकावर संपर्क साधा. त्याचबरोबर www.vigyanashram.com या वेबसाईटला भेट देऊनही तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता. तसेच विज्ञान आश्रम, पाबळ, जिल्हा. पुणे - 412403 महाराष्ट्र, भारत या पत्त्यावरील मुख्य कार्यालयाला भेट देऊ शकता. संपर्कासाठी हा pabal@gmail.com मेल आहे.
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Maharashtra News, Pune, जॉब

  पुढील बातम्या