मुंबई, 10 एप्रिल: जॉबच्या मुलाखतीला जाताना काही प्रश्न अगदी कॉमन असतात. ते म्हणजे तुमच्याबद्दल सांगा किंवा तुम्हाला किती सॅलरी हवी आहे? या प्रश्नांची उत्तरं बरेच उमेदवार अगदी तोंडपाठ करून जातात. पण मुलाखतीला असेही काही प्रश्न विचारण्यात येतात ज्या प्रश्नाची उत्तरं पॉझिटिव्ह द्यावी की निगेटिव्ह हेच आपल्याला समजू शकत नाही. पाचपैकी एक प्रश्न म्हणजे Why did you leave your previous job? म्हणजेच तुम्ही याआधीचा जॉब का सोडला? अनेकवेळा या प्रश्नाचं उत्तरच उमेदवारांकडे नसतं. एक चुकीचं उत्तर आणि तुमच्या हातून नोकरी जाऊ शकते. पण आता टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अक्षयबद्दल सांगणार आहोत ज्याने या प्रश्नाचं इतकं परफ़ेक्ट उत्तर दिलं की मुलाखत घेणारेही त्याच्याकडे बघत राहिले. चला तर जाणून घेऊया या प्रश्नाच्या परफेक्ट उत्तराबद्दल. त्याचं झालं असं की अक्षयनं आपला आधीचा जॉब सोडला आणि नवीन संधीच्या शोधात तो अप्लाय करू लागला. एका मल्टीनॅशनल कंपनीत अखेर अक्षयला मुलाखतीचा चान्स मिळाला. जॉब interview ला जाताना अक्षयनं सर्व IMP प्रश्नांची तयारी उत्तमपणे केली त्याप्रमाणे त्याला प्रश्नही विचारण्यात आले. पण एका प्रश्नावर अक्षय अडकला. या प्रश्नावर अक्षय थांबला पण त्यानं परफेक्ट उत्तर दिलं. IPS Anurag Arya: UP मध्ये ज्यांनी माफियांची लावली वाट; कोण आहेत निडर, बेधडक IPS अनुराग आर्य काय होतं अक्षयचं उत्तर तुम्ही या आधीच जॉब का सोडला? या प्रश्नावर अक्षयनं निरनिराळी उत्तरं दिली. सर्वात आधी अक्षय म्हणाला “मी जो जॉब आधी करत होतो तो चांगला होता मात्र माझे करिअर गोल्स काही वेगळे आहेत आणि तो जॉब त्यासाठी सुटेबल नव्हता म्हणून मला तो जॉब सोडावा लागला. मात्र हा जॉब आणि जॉब प्रोफाइल मला माझ्यासाठी परफेक्ट वाटत आहे म्हणून मला हा जॉब हवा आहे.” “तसंच आधीच्या कंपनीतील माझं वर्क प्रोफाइल मला जसं भविष्यात हवं आहे तसं नव्हतं त्यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मला दुसरा जॉब शोधावा असं वाटलं.” असंही उत्तर अक्षयनं दिलं. सिंदूर, कपाळावर बिंदी आणि हातात बांगड्या; 16 शृंगार करून ऑफिसला जायचे ‘हे’ IG; पण का? कारण वाचून व्हाल थक्क “आधीच्या कंपनीतील काही गोष्टी म्हणजेच वर्किंग स्टाईल आणि काही नियम अचानक बदलले पण मी त्या गोष्टींसाठी तयार नव्हतो म्हणून मला जॉब बदलावा असं वाटला आणि मी नोकरी सोडली.” “जुन्या कंपनीतील वातावरण आणि तिथले माझे सोबती सर्व चांगले होते मात्र करिअरमध्ये पुढे जाताना चांगली सॅलरी असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच मला तुमच्या कंपनीतील चांगली ऑफर मिळाली आणि मी ती नोकरी सोडली.” असं परफेक्ट उत्तर अक्षयनं दिलं.
अक्षयप्रमाणे जर तुम्हालाही असा प्रश्न मुलाखतीवेळी विचारला तर तुम्हीही अशा प्रकारची उत्तरं मुलाखत घेणाऱ्यांना देऊ शकता. यामुळे तुमचं इम्प्रेशन चांगलं असेल आणि तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढतील यात शंका नाही.