मराठी बातम्या /बातम्या /करिअर /वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल कॉलेजेसना मृतदेह कोठून मिळतात? असते विशेष प्रक्रिया

वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल कॉलेजेसना मृतदेह कोठून मिळतात? असते विशेष प्रक्रिया

शरीरशास्त्राचा अभ्यास आणि सखोल संशोधन करण्यासाठी मृतदेह उपलब्ध होणं गरजेचं असतं. मेडिकल कॉलेजला हे मृतदेह कसे उपलब्ध होतात, याबद्दल जाणून घेऊ या.

शरीरशास्त्राचा अभ्यास आणि सखोल संशोधन करण्यासाठी मृतदेह उपलब्ध होणं गरजेचं असतं. मेडिकल कॉलेजला हे मृतदेह कसे उपलब्ध होतात, याबद्दल जाणून घेऊ या.

शरीरशास्त्राचा अभ्यास आणि सखोल संशोधन करण्यासाठी मृतदेह उपलब्ध होणं गरजेचं असतं. मेडिकल कॉलेजला हे मृतदेह कसे उपलब्ध होतात, याबद्दल जाणून घेऊ या.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 05 जानेवारी : वैद्यकीय शिक्षणादरम्यान अनेक पायाभूत गोष्टी गरजेच्या असतात. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, तसंच संशोधनासाठी पुरेशा सुविधा मिळणं गरजेचं आहे. वैद्यकीय शिक्षणात मृतदेहांना जास्त महत्त्व असतं. कारण विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राचा अभ्यास आणि सखोल संशोधन करण्यासाठी मृतदेह उपलब्ध होणं गरजेचं असतं. मेडिकल कॉलेजला हे मृतदेह कसे उपलब्ध होतात, याबद्दल जाणून घेऊ या. यासाठी विशेष प्रक्रिया असते. काही संस्था मेडिकल कॉलेजेनला मृतदेह देतात.

  मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध असणं गरजेचं असतं. मृतदेहांची उपलब्धता ही त्यापैकीच एक महत्त्वाची सुविधा होय. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये दहा विद्यार्थ्यांसाठी किमान एक मृतदेह उपलब्ध असणं गरजेचं आहे. राजस्थानमधल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये अलीकडेच अभ्यासासाठी मृतदेहाच्या कमतरतेचा सामना करावा लागला. तिथल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये संशोधन आणि अभ्यासासाठी मृतदेहांचा एवढा तुटवडा निर्माण झाला आहे, की यासाठी सरकारला विनंती करावी लागली आहे. वारस नसलेले आणि निवारागृहातल्या व्यक्तींचे मृतदेह मिळावेत, यासाठी मेडिकल कॉलेजेसनी सरकारकडे परवानगी मागितली आहे. वैद्यकीय शिक्षणात मृतदेहांना विशेष महत्त्व आहे. कारण विद्यार्थी त्यावर प्रॅक्टिकल करतात, जे संशोधनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे.

  कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब नियंत्रित करतो हा खास लसूण, तुम्हाला माहिती हवाच

  अशा मृतदेहांना कॅव्हेडर्स असं संबोधलं जातं. त्याचा उपयोग मेडिकलचे विद्यार्थी, चिकित्सक आणि इतर शास्त्रज्ञ शरीरविज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, मृत्यूची कारणं शोधण्यासाठी करतात. विविध प्रकारच्या संशोधनासाठीदेखील मृतदेहांचा वापर होतो. वृद्धाश्रम किंवा अनाथालयात मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांचा वापर वैद्यकीय शिक्षणासाठी केला जातो; पण ही गोष्ट खूप दुर्मीळ असते. अशा वेळी मेडिकल कॉलेज पोलीस किंवा स्वेच्छेने देहदान करणाऱ्यांवर अवलंबून असतात.

  वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र शिकवण्यासाठी मानवी मृतदेहाचा वापर केला जातो. मृत शरीराच्या मदतीने विद्यार्थ्यांना जिवंत व्यक्तीचं शरीर कसं कार्य करतं हे समजतं. डॉक्टर, सर्जन, डेंटिस्ट आणि इतर आरोग्यसेवा प्रोफेशनल्ससाठी हा सर्वांत महत्त्वाचा अभ्यासक्रम मानला जातो. मृतदेहाचा वापर करून अनेक जीवरक्षक शस्त्रक्रियांचा सरावदेखील केला जातो. मेडिकल कॉलेजेसना स्वयंसेवक म्हणून काही मृतदेह मिळतात. अशा काही व्यक्ती असतात, की ज्या मृत्यूपूर्वी आपला देह शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी दान करण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तींचा मृतदेह मेडिकल कॉलेजेसकडे सोपवला जातो. तसंच काही मृतदेह असे असतात, जे पोलिसांकडून मेडिकल कॉलेजला दिले जातात. हे मृतदेह बेवारस असतात, ज्यांना नेण्यासाठी कोणीही येत नाही.

  First published:

  Tags: Education, Medical, Viral news