मुंबई, 21 एप्रिल: दरवर्षी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी (Engineering) आणि वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical Examination) शिकण्यासाठी अत्यंत कठीण प्रवेश परीक्षा (Entrance Exams) द्याव्या लागतात. याद्वारे तुम्हाला देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते. अनेकवेळा लाखो उमेदवारांनी प्रवेश परीक्षेत सहभाग घेतल्याने त्यांच्यात गुणांबाबत टाय होते. टाय म्हणजे परीक्षेत किंवा सामन्यात समान गुण मिळवणे. क्रिकेट सामन्यांव्यतिरिक्त, अनेक वेळा परीक्षेत गुणांसाठी टाय असते, म्हणजेच दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळतात. अशा स्थितीत त्यापैकी कोणाला टॉपर (Process to decide Toppers in JEE and NEET) घोषित करायचे, हे ठरवणे कठीण होऊन बसते. हे टाळण्यासाठी NEET परीक्षा आणि JEE परीक्षेत टाय ब्रेकरचा नियम (What is Tie Breaker system) अवलंबला जातो. म्हणूनच ही टाय ब्रेकर सिस्टम नक्की काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. टाय ब्रेकिंग पॉलिसी म्हणजे काय? टाय ब्रेकिंग पॉलिसी किंवा टाय ब्रेकर नियम म्हणजे- जर दोन विद्यार्थ्यांनी परीक्षेत समान गुण आणि टक्केवारी मिळवली आणि त्यांच्यातील टाय सोडवला नाही तर टाय ब्रेकरचा नियम पाळला जाईल. याद्वारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाते. अशा परिस्थितीत या परीक्षेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत प्राधान्य देण्याची तरतूद आहे. पालकांनो, तुमचीही मुलं यंदा पहिल्यांदा शाळेत जाणार आहेत? मग ‘या’ खास टिप्स वाचाच NEET चे टाय ब्रेकर नियम NEET परीक्षेत, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जैव (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) मध्ये जास्त गुण किंवा टक्केवारी मिळविलेल्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे, गुण किंवा टक्केवारीबाबत विद्यार्थ्यांमध्ये बरोबरी असेल, तर NEET परीक्षेत वयाने मोठा असलेला विद्यार्थी गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकावर असेल. JEE चे टाय ब्रेकर नियम जेईई परीक्षेत, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितात जास्त गुण किंवा टक्केवारी मिळविलेल्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाते. गुण किंवा टक्केवारीबाबत विद्यार्थ्यांमध्ये बरोबरी असल्यास, या प्रकरणात ज्या विद्यार्थ्याचे सर्व विषय एकत्र करून चुकीचे उत्तर आणि बरोबर उत्तर यांचे गुणोत्तर असेल त्यांना निकालात प्राधान्य दिले जाईल. या पद्धतीनंतरही गुणांबाबत विद्यार्थ्यांमध्ये टाय झाला, तर यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत अव्वल स्थान दिले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.