Home /News /career /

NDA म्हणजे नक्की काय? NDA मध्ये भरती होण्यासाठी काय योग्यता असणं आवश्यक? जाणून घ्या

NDA म्हणजे नक्की काय? NDA मध्ये भरती होण्यासाठी काय योग्यता असणं आवश्यक? जाणून घ्या

NDA जॉईन करण्यासाठी नक्की कोणते निकष आणि कोणते गुण तुमच्याकडे (Exam Pattern of NDA) आवश्यक आहेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत

    मुंबई, 18 ऑगस्ट: जर तुम्ही तरुण आहात आणि तुम्हाला भारतीय सेना (Army), वायुसेना (Air Force) किंवा नौसेनेत (Navy) भरती होण्याची इच्छा असेल तर तुम्हाला NDA म्हणजे नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) ही परीक्षा देणं महत्त्वाचं आहे. भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी NDA ची भरती परीक्षा देतात आणि यापैकी काही लोकं देशसेवा करण्यासाठी पुढेही असतात. यापूर्वी फक्त पुरुष उमेदवार NDA ची भरती परीक्षा देण्यासाठी पात्र (Eligibility for NDA exam) होते मात्र आता महिलाही ही परीक्षा देऊ शकणार आहेत (Women will give NDA). मात्र NDA नक्की आहे तरी काय? NDA जॉईन करण्यासाठी नक्की कोणते निकष आणि कोणते गुण तुमच्याकडे (Exam Pattern of NDA) आवश्यक आहेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. NDA भरती परीक्षा आहे तरी काय? NDA ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते म्हणजे NDA-I आणि NDA-II. पहिली अधिसूचना जानेवारीत जारी केली जाते आणि दुसरी अधिसूचना जूनच्या आसपास येते. पहिली प्रवेश परीक्षा एप्रिलच्या आसपास आणि दुसरी सप्टेंबरच्या आसपास घेतली जाते. एनडीए अर्जामध्ये दोन भाग असतात. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेतली जाते आणि इच्छुक उमेदवार http://www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय सेना, वायुसेना किंवा नौसेनेत भरती होण्यासाठी ही परीक्षा देणं अनिवार्य आहे. NDA साठी पात्रता अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारत, नेपाळ किंवा भूतानचे नागरिक असणं आवश्यक आहे.. 01 जानेवारी 1962 पूर्वी भारतात आलेला एक तिबेटी शरणार्थी जर भारताचा अँग्रिक होऊ इच्छित असेल तर पात्र आहे. भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने बर्मा, श्रीलंका, पाकिस्तान आणि पूर्व आफ्रिकन देश केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे आणि इथियोपिया किंवा व्हिएतनाममधून स्थलांतरित झालेली भारतीय वंशाची व्यक्ती देखील पात्र आहे. हे वाचा -आता मुलींनाही देता येणार NDA ची परीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय शैक्षणिक पात्रता सेनेत भरती होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत 10+2 पॅटर्नचाप्रमाणे 12 वी पास.असणं आवश्यक. वायुसेना आणि नौसेनेत भरती होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत 10+2 PCM पॅटर्नचाप्रमाणे 12 वी पास.असणं आवश्यक. शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. 'वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त' म्हणजेच उमेदवारांकडे चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि कोणत्याही रोग /सिंड्रोम /अपंगत्वापासून मुक्त असणं आवश्यक आहे. कोणत्याही भूभाग, हवामानात, समुद्र आणि हवेमध्ये लष्करी कर्तव्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कमी अँडणार नाही याची काळजी उमेदवारांनी घेणं आवश्यक आहे. वयोमर्यादा केवळ वयवर्षे 16½  ते 19½ या वयोगटातील पुरुष आणि महिलाही NDAमध्ये सामील होऊ शकतात. परीक्षेचं स्वरूप राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या प्रवेशामध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी यांचा समावेश आहे. लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. ज्यात गणित (Mathematics) आणि सामान्य क्षमता चाचणी (The General Ability Test) हे पेपर असतात तर यानंतरर हे पेपर पास करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Exam, Indian army, Indian navy, NDA

    पुढील बातम्या