मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career: यूपीएससीत अनुत्तीर्ण झालात, तर ‘या’ क्षेत्रांत आहेत करिअरच्या संधी

Career: यूपीएससीत अनुत्तीर्ण झालात, तर ‘या’ क्षेत्रांत आहेत करिअरच्या संधी

Career: यूपीएससीत यश मिळालं नाही, तरी त्या अभ्यासाच्या जोरावर इतर काही क्षेत्रांत करिअर करता येऊ शकतं. इतर परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना चांगली सरकारी नोकरी मिळू शकते.

Career: यूपीएससीत यश मिळालं नाही, तरी त्या अभ्यासाच्या जोरावर इतर काही क्षेत्रांत करिअर करता येऊ शकतं. इतर परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना चांगली सरकारी नोकरी मिळू शकते.

Career: यूपीएससीत यश मिळालं नाही, तरी त्या अभ्यासाच्या जोरावर इतर काही क्षेत्रांत करिअर करता येऊ शकतं. इतर परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना चांगली सरकारी नोकरी मिळू शकते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 सप्टेंबर: निराशेच्या गर्तेत जाऊन आत्महत्त्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भारतात खूप आहे. करिअरचा डोळसपणे विचार न करणं आणि अपयशाची तयारी न ठेवणं या दोन प्रमुख चुका विद्यार्थी करतात. यूपीएससी ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी दरवर्षी बसतात. मात्र त्यातील काही शेकडा विद्यार्थी उत्तीर्ण होतात. ही परीक्षा खूप कठीण असून त्यासाठी विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षं मेहनत करावी लागते. यात उमेदवारीची वर्षं निघून जातात. त्यातच जर परीक्षेत यश मिळालं नाही, तर विद्यार्थी हताश होतात. मात्र, यूपीएससीत यश मिळालं नाही, तरी त्या अभ्यासाच्या जोरावर इतर काही क्षेत्रांत करिअर (Career Options For Students Failing In UPSC) करता येऊ शकतं.

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक समजली जाते. प्रशासकीय पदांवर नोकरी मिळवण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते. अनेक नागरी सेवांमध्ये या परीक्षा देऊन भरती होता येतं. सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित समजली जाते तसंच अनेक भत्ते व चांगला पगार यामुळे अनेक तरुण-तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. अनेक वर्षं अभ्यास करून जर परीक्षेत यश मिळालं नाही, तर निराश होऊन डिप्रेशनमध्ये जाण्याची भीती असते. मात्र अशा विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नये, त्यांना करिअरच्या इतरही काही (What After UPSC Exam) संधी उपलब्ध असतात. सरकारकडून आणखी काही परीक्षा घेण्यात येतात. पीएससी, एसएससी, आरआरबी, आयबीआय, सीएपीएफ यांसारख्या सरकारी परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात. त्यांचा अभ्यासक्रम यूपीएससी परीक्षांशी मिळताजुळता असतो. या परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना चांगली सरकारी नोकरी मिळू शकते.

शिक्षण क्षेत्रात करिअर

यूपीएससी परीक्षेसाठी सर्वच क्षेत्रांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या अभ्यासाच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात (Teaching Profession) करिअर करता येऊ शकतं. कोचिंग क्लास किंवा शाळा-महाविद्यालयांत शिक्षक म्हणून नोकरी करता येऊ शकते. स्वतःचे क्लासेस काढता येऊ शकतात.

कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर

यूपीएससी परीक्षेसाठीचा अभ्यास व अनुभव यामुळे क़र्पोरेट क्षेत्रात (Corporate Job) नोकरी मिळवण्यासाठी मदत होते. मार्केटिंग, डेटा अ‍ॅनॅलिसिस, सेल्स या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवणं तुलनेनं सोपं होतं. कॉर्पोरेट कंपन्याही या विद्यार्थ्यांना कामासाठी निवडतात. यामुळे चांगल्या पगाराची नोकरी विद्यार्थ्यांना मिळू शकते. ज्ञान कधीही वाया जात नाही असं म्हणतात. त्यामुळे यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हीच गोष्ट लक्षात ठेवून पुढच्या करिअरचा बॅकअप प्लॅन तयार ठेवला पाहिजे.

First published:

Tags: Career, Upsc, Upsc exam