मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Vizag Steel Recruitment: स्टील कंपनीत विविध जागांसाठी भरती; आताच करा अप्लाय

Vizag Steel Recruitment: स्टील कंपनीत विविध जागांसाठी भरती; आताच करा अप्लाय

अप्लाय करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

अप्लाय करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

अप्लाय करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडच्या (RINL) अंतर्गत येणाऱ्या विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये (Vizag Steel) पद्भारतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. टेक्निकल क्षेत्रातील अप्रेन्टिसची (Apprentices) पदभरती होणार आहे. यासाठी एकूण 319 जागा रिक्त आहेत. अप्लाय करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

या पदांसाठी पदभरती

फिटर  - 75

टर्नर - 10

मशीनिस्ट - 20

वेल्डर (G & E) - 40

MMTM -  20

इलेक्ट्रिशियन - 60

कारपेंटर - 20

मेकॅनिक (R & AC) - 14

मेकॅनिक डिझेल - 30

COPA - 30

एकूण जागा - 319

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सांधीत क्षेत्रात ITI- NCVT केलं असणं आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा

उमेदवार 01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 25 वर्षे वयोगटातील असणं आवश्यक आहे. SC किंवा ST उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात येईल. तर  OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात येईल.

हे वाचा - Career Point: Advertising क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी; बघा संपूर्ण माहिती

शुल्क

सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी  ₹ 200 / शुल्क असणार आहे. तर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 100 / - रुपये शुल्क असणार आहे.

शेवटची तारीख आणि परीक्षा

या पदासाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2021 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. तर या  पदभरतीची परीक्षा दिनांक 08 ऑगस्ट 2021 ला होणार आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs, Vizag, ओबीसी OBC