मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Point: Advertising क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी; बघा शिक्षणसंबंधीची संपूर्ण माहिती

Career Point: Advertising क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी; बघा शिक्षणसंबंधीची संपूर्ण माहिती

आज आम्ही तुम्हाला  या क्षेत्रात शिक्षण घेण्यापासून ते करिअरपर्यंत सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला या क्षेत्रात शिक्षण घेण्यापासून ते करिअरपर्यंत सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला या क्षेत्रात शिक्षण घेण्यापासून ते करिअरपर्यंत सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 जून: आजकालच्या जगात सोशल मीडियामुळे (Social media) जाहिरातींचं (Advertisements) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अगदी टीव्हीवरील जाहिरातींपासून (TV Advertisements)  ते सोशल मीडिया अप्लिकेशनवरच्या जाहिरातींपर्यंत (Social media Advertisements) जग समोर गेलं आहे. म्हणूनच या क्षेत्रात करिअर (career in Advertisement) करण्यासाठी अनेक संधी उपल्बध आहेत. त्यात या क्षेत्रात भरघोस पैसेही (salary in Advertisement) मिळतात. विशेष म्हणजे जाहिरातींमध्ये महिलांना अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यामूळे महिलांसाठी मोठ्या करिअरच्या (Career for women) संधी या क्षेत्रात आहेत. आज आम्ही तुम्हाला  या क्षेत्रात शिक्षण घेण्यापासून ते करिअरपर्यंत सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत.

हे गुण असणं आवश्यक

जाहिरात क्षेत्रात आपल्याला ओळख आणि कीर्ती मिळते. या क्षेत्रात आपल्याभोवतीच्या वातावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. तसंच जगात काय चाललंय आणि काय हवंय याबद्दल ज्ञान असणं आवश्यक आहे. आपल्या टार्गेट ऑडियन्सना (Target Audience) मोहक जाहिरातींद्वारे मोहित करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे.

हे वाचा - कम्प्युटर पदवी धारकांना का आली काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ? वाचा

हे शिक्षण घेणं आवश्यक

जाहिरात क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमच्यात पॅशन (Passion) आणि जिद्द असणं महत्त्वाचं आहे. यात शिक्षण घेण्यासाठी बारावीनंतर बॅचलर इन ऍडव्हर्टायझिंग (Bachelor in Advertisement) हा कोर्स आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशन (Post Graduation in Advertisements) करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात पदवी असणं आवश्यक आहे.

हे आहेत काही टॉप कॉलेजेस

भारतीय विद्या भवन, (मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली)

सेंटर फॉर मास मीडिया, वायएमसीए, नवी दिल्ली

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन्स (आयआयएमसी), नवी दिल्ली

केसी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, मुंबई

मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, अहमदाबाद (एमआयसीए)

नोकरीची संधी

जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर कुठल्याही जाहिरातीच्या एजन्सीमध्ये (Advertisements Agency) तुम्हाला जॉब मिळू शकतो. तसंच कुठल्या प्रोडक्शन हाऊसमध्येही (Production House) नोकरी मिळू शकते.

First published:

Tags: Advertisement, Career, Career opportunities, Job, Jobs